पाताळेश्वर विद्यालयात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

0

सिन्नर : पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रभान  रेवगडे  होते. राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण सिन्नर आगाराचे माजी डेपो प्रमुख मधुकर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत किरण गवळी,विमल गवळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. व्या

सपीठावर पाडळी गावच्या सरपंच सुरेखा रेवगडे उपसरपंच श्रीमती सुरेखा बोगीर शालेय समितीचे सदस्य धनंजय रेवगडे,किशोर पालवे, नाना रामभाऊ पाटोळे,भाग्यश्री पाटोळे,जनाबाई रेवगडे,अनिल शिंदे, दत्तात्रय पालवे, शांताराम जाधव, संदीप रेवगडे इ. ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी घोषणा देत देत ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी एस. एम. एल मुंबई या कंपनीने विद्यालयासाठी दोन वटवृक्षांची रोपे देऊन त्याचे विद्यालयात वृक्षारोपण केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन किशोर सातपुते यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांना बिस्कीटचे पुडे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत पाडळी यांच्या अनुदानातून शालेय आदिवासी व गरीब होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने ध्वज प्रतिज्ञा व मतदार प्रतिज्ञा  घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता देशमुख व आर. व्ही. निकम यांनी केले. यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे विद्यालयातील शिक्षक बी. आर. चव्हाण, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सी.बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, आर.एस. ढोली, ए.बी.थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here