पालकांनी अनुभवला क्रीडा स्पर्धेचा आनंद

0

फुलंब्री प्रतिनिधी :- जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा,जळगाव मेटे येथे केंद्रस्तरीय पालक व विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते विविध रंगी फुगे आकाशात सोडून आणि क्रीडा ज्योत पेटवून या स्पर्धेचे  उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक )जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (योजना) अरुणा भुमकर,गटविकास अधिकारी उषा मोरे, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी जळगाव मेटे येथील विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी जपानी भाषेमध्ये संवाद साधला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.आपल्या मार्गदर्शनात क्रीडा संस्कृती रुजली पाहिजे,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तसेच टारगेट पीक ॲपच्या माध्यमातून शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्याचा मानस विकास मीना यांनी व्यक्त केला.या उद्घाटन समारंभास शिक्षण विस्तार अधिकारी कैलास व्यवहारे,केंद्रप्रमुख व्ही.एस.सुसुंद्रे,केंद्रीय मुख्याध्यापक संजय भुमे यांची उपस्थिती होती.पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेतील काही सामने देखील विकास मीना यांनी बघितले.आळंद केंद्रातील विविध शाळांनी या केंद्रस्तरीय कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कबड्डी,खो-खो,गोळाफेक,रस्सीखेच अशा विविध प्रकारच्या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडल्या.

एकूणच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थ तसेच शालेय शिक्षण समिती ग्रामपंचायत जळगाव मेटे यांचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत बापू मेटे शालेय समिती अध्यक्ष होते.यावेळी गावातील नागरिक तारू पाटील मेटे,मंगेश अण्णा मेटे,माजी सभापती सर्जेराव पाटील मेटे,उपसरपंच दत्ताभाऊ मेटे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच विद्यार्थ्यांमधून समर्थ तुपे यांने आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नारायण जाजेवार यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर मोहिते व तातेराव जाधव यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पांडुरंग जाधव,रुपेश दीक्षित, रोहिणी धोंगडे,सुवर्णा कांबळे, गायत्री देशपांडे,रामेश्वर पवार,अविनाश डोंगरे, नंदा बोर्डे,उज्वलकुमार म्हस्के,सुनील चिकटे,उल्हास ढेपले,एन.डी.अहिरे,सांडू शेळके,विक्रम पांढरे या शिक्षक बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले .

{  या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी स्पर्धकांबरोबर स्वतः गोळा फेक या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि साडेसात मीटर पर्यंत गोळा फेकून उपस्थितांची मने जिंकून घेतली.}

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here