हडपसर / पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर विभागीय पुरुष बॉडीबिल्डर स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेजमधील सुरज सरोज या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर काकडे यांनी त्याचे अभिनंदन करीत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्याने मिळविलेल्या यशाबद्दल फिजिकल डायरेक्टर दत्ता वसावे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा.संजय जड़े, आय.क्यू.ए.सी. सह-समन्वयक डॉ.शहाजी करांडे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.