सिन्नर प्रतिनिधी : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी येथे मला अधिकारी व्हायचंय या उपक्रमांतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कॅप्टन प्रितीश उत्तम पवार यांनी मुलींना विशेष मार्गदर्शन करतांना स्वत:च्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आपण निश्चितच पुढे यशाचे शिखर गाठू शकतो .माझे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा सोनांबे येथे झाले.त्यांनतर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात घेतले . प्राथमिक शाळेत असतांना प्रगती केली.जिद्द,मेहनत, महत्वाकांक्षी प्रयत्न या सर्व गोष्टी ठेवून जाणीवपुर्वक प्रयत्न केले.
सुरुवातीला आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग फार खडतर असतो.त्यासाठी स्मार्ट वर्क करणे आवश्यक असते त्याचबरोबर नियोजन महत्वाचे असते.आई-वडिलांच्या आर्थिक परिस्थितीची जान ठेवा. ध्येय निश्चित केल्यानंतर दुर्दम्य महत्वकांक्षाच्या जोरावर ध्येयापर्यंत पोहचता येते .
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी उच्च ध्येय व मनात खुणगाठ बांधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पालक,गुरुजन यांच्या मार्गदर्शनातून पुढे जावे हा सल्ला दिला.शालेय जीवनात कोणत्याही कामाची लाज बाळगू नका.मात्र कोणतेही काम ईमानदारीने करा.म्हणजे जीवनात यशस्वी व्हाल,स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी शालेय जीवनात अंगीकारा म्हणजे तुमचे ध्येय गाठून तुम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण कराल असे सांगितले.
यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयातील उपशिक्षक टी.के.रेवगडे,शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे, बापू खेलूकर शिक्षक बी.आर. चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी, एम.एम.शेख, सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे, एस.डी.पाटोळे, आर.एस.ढोली, ए.बी.थोरे हे उपस्थित होते सुत्रसंचलन सविता देशमुख यांनी केले तर आभार आर टी गिरी यांनी मानले.