बाल मनाचा अविष्कार उजळला दीपावलीचा आनंद बहार

0

सिन्नर : पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळवून त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळण्यासाठी श्री रेवगडे टी.के.व कला शिक्षक गांगुर्डे के.डी.यांनी विद्यार्थ्यांना चला बनूया दीपावलीचे शुभेच्छा पत्र व आकाश कंदील परंतु ते सर्व टाकाऊ पदार्थापासून ही कल्पना मुलांनी डोळ्यासमोर ठेवून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीतून विविध प्रकारचे शुभेच्छा पत्र व आकाश कंदिलाचे विविध नमुने तयार केले. यासाठी टाकाऊ कागद,बांबूच्या काड्या, जिलेटीन पेपर यांचा उपयोग करून आपल्या निरीक्षण शक्तीचा वापर केला व विविध कलाकृती तयार केल्या शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेतून आपण तयार केलेल्या आकाश कंदिलाचा मी माझ्या घरी वापर करेल व स्वदेशीचा वापर करून चायना वस्तूवर बहिष्कार करेल असे सांगितले.

 

बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी मुलांची दांडगी इच्छाशक्ती व कल्पना शक्तीतून आम्ही नेहमी विविध उपक्रम राबवितो.मुले यातून आपल्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना नेहमी चालना देऊन भविष्यात आपण एक कुशल कारागीर व समाज उपयोगी नागरिक निर्माण व्हा असे सांगितले. या उपक्रमाप्रसंगी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम, एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी,एम.एम.शेख,  सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे, आर. एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here