भारत स्काउट गाईड नाशिक शिक्षक प्रशिक्षण केंद्राला . आ. किशोरभाऊ दराडे यांची भेट .

0


नाशिक नाशिक जिल्हा स्काऊट गाईड यांच्या माध्यमातून नाशिक जिल्हयातील स्काऊट गाईड शिक्षकांचे प्रशिक्षण कॅम्प चालू आहे . सदर कॅम्प मधील शिक्षक व शिक्षिकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यासाठी आपल्या विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे, नाशिक, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख उपस्थित होते .

स्काउट गाईड चे शिक्षणातील महत्व , स्काउट गाईडची वर्षभराची कार्यप्रणाली, स्काऊट गाईड शिक्षकांच्या समस्या , शासकीय उदासीनता, स्काऊट प्रशिक्षण केंद्र नाशिक घोटी हायवेवर मंजूर असुन त्यासाठी निधीची अवश्यकता आहे ती आपण पुर्ण करावी ई. गोष्टीवर एस बी देशमुख यांनी माहिती विषद केली . त्यांचे स्काऊट गाइड मधील योगदान खूप मोठे असून सध्या ते सह – आयुक्त म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळतात .तसेच किशोरभाऊ दराडे यांनी स्काऊट गाईड शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करून शालेय शिस्त , स्वावलंबन,उत्कृष्ट नागरिक घडवण्याचे यथोचित कार्य स्काउट गाईड शिक्षकांच्या माध्यमातून होते . त्यांच्या शिक्षक प्रशिक्षणाला व भावी वाटचालीला हार्दीक शुभेच्छा दिल्या .

यावेळी प्रदिप सांगळे, बी के नागरे, अनिल माळी, भागिनाथ घोटेकर, बी. के शेवाळे, डी. एस ठाकरे, सुरेश घरटे ,सोमनाथ धात्रक, आर टी जाधव, सखाराम जाधव, गोरख येवले, बी के अहिरे, एम डी काळे , बाळासाहेब गांगुर्ड इ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here