येवला, प्रतिनिधी
: एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” १ ते १५ जानेवारी दरम्यान अभियान राबविण्यात आला. आजच्या बदलत्या जीवनशैलीत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन तसेच सामूहिक वाचन घेण्यात आले, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्यात आली.
यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचे पुस्तके घेऊन त्यावर लेखनव कथन केले. या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळ तळले यांनी वाचनातून बुद्धीला चालना मिळते. वाचन हे माणसाला जगणे शिकवते. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पुस्तकांबरोबर आत्मचरित्र तसेच कथा कादंबरी यांचेही वाचन करावे.सदर उपक्रमासाठी डॉ. प्रशांत मालपुरे ,ग्रंथपाल स्वाती रुमणे,रोहित कोरडे, आदर्श वाघ यांनी परिश्रम घेतले.