येवला प्रतिनिधी अंदरसुल- मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदरप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री आर.बी गायकवाड उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या व सर्व प्राध्यापकांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गाडगेबाबा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आणि जनजागृती करण्यात घालवले . देव दगडात नाही तर माणसात आहे असे या संताने लोकांना सांगितले. सदर प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली तसेच कार्यक्रमात सामुदायिक प्रार्थना, विविध धार्मिक व सेवाभावी कार्यक्रम सादर केले . प्रसंगी तांदळे प्रियंका व दांगट देवयानी या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले तसेच वेगवेगळी पथनाट्य, भारुड सादर केले. त्यानंतर अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले व तेजस गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले, महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ सुवर्णा म्हस्के, प्रा.मयूर भागवत, प्रा. विजय भाटे, प्रा.गणेश अमोदकर,प्रा. शिवप्रसाद शिरसाठ, प्रा.प्रतिभा कोटमे,प्रा. प्रिती वल्टे,प्रा. प्रतिक्षा वाकचौरे, प्रा.वैष्णवी माळी आदि उपस्थित होते.