माहूर येथील अनुजा जगताप हिच्या चित्राची भारतीय रक्षा मंत्रालयाने घेतली दखल

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम फंक्शन  कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचा विद्यार्थ्यांना मान
………………………………………………………………
माहूर : पराक्रम दिवस व आजादी का अमृत महोत्सव यांच्या  निमित्ताने भारतीय रक्षा मंत्रालय व my gov यांच्या संयुक्त विद्यमाने  तारीख 11 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान  सुभाष चंद्र बोस Drawing portrait competition घेण्यात आली यामध्ये देशातील सर्वोत्तम 25 चित्रांची निवड करण्यात आली.त्यामध्ये माहूरची अनुजा दिगंबर जगताप हिची सुद्धा निवड करण्यात आली होती.
                सदरील चित्रकला स्पर्धेत वय सहा ते बारा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.ज्या विद्यार्थ्यांचे छायाचित्र निवडण्यात आले होते ते विजेते व त्यांचे पालक यांना दि.२५ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  होम फंक्शन  कार्यक्रमात सहभागी होता आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मंत्री गणांची उपस्थिती होती. तसेच प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथ दिल्ली येथील ध्वजारोहण व  परेड पाहण्याचे सौभाग्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मिळाले.
  विजेत्यांना पाच हजार रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. विद्यार्थी व पालक यांचा येण्या जाण्याचा विमान प्रवास व राहण्याची व्यवस्था रक्षा मंत्रालयातर्फे करण्यात आली होती असे पालक दिगंबर जगताप यांनी सांगितले.
                        अनुजा दिगंबर जगताप यांच्या चित्राची निवड झाल्याचे व तिला दिल्ली दरबारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले याबद्दल तिचे माहूर तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here