मुख्याध्यापक संघ व बंसल क्लासेस कडून एस एस सी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0

सिन्नर : नुकत्याच पार पडलेल्या मार्च 24  च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांचे कौतुक करण्यासाठी व यथोचित सत्कार करण्यासाठी  मुख्याध्यापक संघ व बंसल क्लासेस सिन्नर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शनासाठी प्राध्यापक नितीन बानुगडे यांचे व्याख्यान आयोजित करून त्यांना योग्य दिशा व योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी निश्चित ध्येय गाठतील यासाठी योग्य मार्गदर्शनाचे काम मुख्याध्यापक संघ व बंसल क्लासेस  करते व विद्यार्थी घडतो. आज समाजात दिशाहीन विद्यार्थी भरकटतो यासाठी बंसल क्लासेस सिन्नर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले काम करते असे सांगितले. यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप व विद्यार्थ्यांचे कौतुक करताना नवनिर्वाचित नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्राप्त करून विविध स्पर्धात्मक परीक्षा मध्ये पुढे जाऊन आपल्या आई-वडिलांचे व तालुक्याचे नाव उज्वल करा असे सांगितले.

बंसल क्लासेसचे संचालक नामदेव कराड यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनात योग्य मार्गदर्शकाची भूमिका बंसल क्लासेस पार पाडते यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त गुणांचा अधिक विकास करण्यासाठी नामांकित असा बंसल क्लासेसची शाखा आपण सिन्नरमध्ये सुरू केल्याचे सांगितले. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख यांनी आपल्या सिन्नर  तालुक्याची घवघवीत यशाची परंपरा कायम राखल्याने गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत असताना विद्यार्थ्यांनी दहावीनंतर योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा व पुढे जा यासाठी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आम्ही करू असे सांगितले.

बंसल क्लासेसचे व्यवस्थापक निवृत्ती केदार व कैलास खताळे, सविता खताळे यांच्या योग्य नियोजनातून येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी अभ्यासाची योग्य दिशा ,योग्य मार्गदर्शन घेऊनच पुढे जातो व तो यशस्वी होतो असे सांगितले. या प्रसंगी युवा नेते आदरणीय उदय भाऊ सांगळे यांनी खरे सोने ग्रामीण भागातच आहे आजपर्यंत आपल्या तालुक्यातील अनेक विद्यार्थी उच्च अधिकारी झाल्याचे सांगितले. यासाठी  विद्यार्थ्यांनी अभ्यास व त्याचे नियोजन व त्यासाठी योग्य मार्गदर्शनाचे काम बंसल क्लासेस करते असे सांगितले. या कार्यक्रमासाठी एम डी काळे, लक्ष्मण बेनके , आर एल लोढे,  सविता देशमुख, वृषाली सानप, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेन्द्र महात्मे, कार्यवाह जमीर सय्यद व विज्ञान संघाचे कार्यवाह आर टी गिरी  ,नामदेव कराड सर सिन्नर तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक, विद्यार्थी व पालक बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here