एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात निर्भय कन्या आरोग्य कार्यशाळा
येवला, प्रतिनिधी
शारीरिक व मानसिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे जर योग्य काळजी घेतली तर शारीरिक,मानसिकता,योग्य आहार जपला तर आरोग्याशी निगडित समस्या उध्दभवणार नाहीत.निरोगी अन्न खाणे,फळे,भाज्या,संपूर्ण धान्य आणि पाणी पिण्यामुळे तुमचे शरीर आनंदी राहण्यास मदत होते.किशोरवयीन काळात भावनिक आणि मानसिक आरोग्य स्त्रीरोग आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध स्री रोग तज्ञ डॉ.कविता दराडे यांनी केले.
बाभूळगाव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या विद्यार्थिनीसाठी निर्भय कन्या अभियानाअंतर्गत आरोग्य जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी डॉ.दराडे यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थीना टिप्स दिल्या.यावेळी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी २०० हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
बदलत्या जीवनशैलीत महिलांना विविध आजारांनी ग्रासले आहे.संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणारी महिला मात्र स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजी दिसते.त्यामुळे स्वतः बद्दल करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.किशोरवयापासून चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात. विशेषता आपली भावनिकता,मानसिकता आणि खाणेपिणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्याचे डॉ.दराडे यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एम.यादव म्हणाले कि,विद्यार्थिनींनी निर्भय होण्यासाठी सकारात्मक विचार अंगिकारून विकास साधावा.सध्याचा काळ मुलींच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण आहे.निर्भय कन्या अभियान राबविणारे पुणे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ असून मुलींमध्ये धैर्य आणि हिंमत निर्मितीसाठी सदर योजना राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.विभागप्रमुख डॉ.विद्या निकम, विध्यार्थी विकास अधिकारी प्रा.संदिप कराळे,शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.संदीप येवले व महिला प्राध्यापक उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार प्रा. संघमित्रा कांबळे यांनी केले.