“मृदा-जल व्यवस्थापन मानवी गरज”:- प्रा. डॉ. देविदास रणधीर

0

कोपरगाव प्रतिनिधी : “जमिनीची मृदा जमिनीची निर्मिती कशी होते, मृदेचे किती स्तर असतात, मृदेचे उपयोग व महत्त्व स्पष्ट केले. सुपीक मृदेमुळेच आपणास मोठ्या प्रमाणात शेतीचे उत्पादन करता येते. विविध प्रकारची शेती मृदेमुळेच करता येते, परंतु मृदा जिवंत ठेवायची असेल तर तिची सुपीकता टिकून ठेवायची असेल तर आपणास मृदा संवर्धन करणे गरजेचे आहे. भारतात शेती विविध पद्धतीने केली जाते. मृदा ही खडकांपासून तयार होते. अशी खडकांपासून मृदा तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. परंतु हीच मृदा अतिपर्जन्य, पूर, खनन या कारणामुळे नष्ट होते. त्यामुळे मृदा व्यवस्थापन गरजेचे आहे”. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी.एम. महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रा. डॉ. देविदास रणधीर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातील व्याख्यानमालेत आज प्रा. डॉ. देविदास रणधीर यांनी ‘मृदा-जल व्यवस्थापन’ या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपले विचार मांडले. त्यांनी आपल्या मनोगतात मृदा-जल व्यवस्थापन याविषयावर बोलताना “आज जगातील प्रत्येक राष्ट्रात जलव्यवस्थापन ही मानवी जीवनातील महत्त्वाची समस्या बनली आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी शुद्ध जल संवर्धन करणे गरजेचे आहे. कारण आज देशभरातील नद्या, ओढे, नाले तलाव हे प्रचंड प्रमाणात दूषित झालेल्या दिसून येतात. त्यावर सर्वांनी एकत्रित येऊन शुद्ध पाण्यासाठी काम केले पाहिजे. गरजेपुरतेच पाणी वापरले पाहिजे, जर आपण जल व्यवस्थापन केले नाही तर भविष्यात जगात पाण्यासाठी युद्ध होऊ शकते. हे टाळण्यासाठी पाणी व्यवस्थापन ही काळाची गरज आहे,असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांनी, “विद्यार्थ्यांना आपल्या घरातूनच जल व मृदा व्यवस्थापन केल्यास आपण
या समस्येतून बाहेर पडता येईल.”असाविश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिघे एम. के यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. बी. एम. वाघमोडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बंडेराव तऱ्हाळ, प्रा.डॉ. यू. एल.भोर, प्रा. डॉ. रांधवणे पी. व्ही. हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here