सिन्नर प्रतिनिधी : मुले मोबाईलच्या अधिक आहारी गेल्यामुळे अनेक समस्या पालकांना भेडसावत आहे. मोबाईल नावाचे साधन खूप उपयोगी परंतु त्यांच्या उपयोगा ऐवजी आपण दुरुपयोग शोधू लागलो. अगदी तान्या बाळास त्याची भूक भागविण्याचे काम तो करू लागला. रील्स बघून मुले मुली अनेक संकटांना बळी पडू लागले.नको त्या गोष्टींचा शोध घेऊ लागले. अभ्यासाचे वेड सोडून मोबाईलच्या वेळेत गुंतवू लागले.अगदी तरूणापासून वयोवृद्ध माणसांना सुद्धा या मोबाईल नावाच्या भुताने झपाटले माणूस नको तेवढा वेळ वाया घालू लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या व्यसनापासून दूर रहावे. असा सल्ला सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला . पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी तालुका सिन्नर येथील आयोजित कार्याक्रमात ते बोलत होते.
गायकवाड पुढे म्हटले की मोबाईल वरील नको त्या बाबी बघून माणूस मनोविकृत बनला. प्रलोभनांना बळी पडून अनेक ठिकाणी आपली गुंतवणूक करून तो फसवू लागला आणि मग कायद्याच्या संरक्षणाचा आधार सापडू लागला.मोबाईल बघता बघता अनेक मने जुळवून आपली स्वत:ची फसवणूक झाल्याची समजू लागली.शालेय विद्यार्थ्यांनी आपली निकडीची गरज म्हणून मोबाईल वापरू नका आपल्या पालकांना समाजातील घटकांना त्याचे फसवणुकीचे कारणे सांगा व या मोबाईलच्या जास्त आहारी जाऊन आपल्या जीवनाचा शेवट करून अनेक व्याधींना व आरोग्याच्या समस्यांना स्वतःहून जवळ करू नका.असेही ते म्हणाले .
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी बाल वयातच विद्यार्थ्यांना मोबाईलचे उपयोग व दुरुपयोग समजावून वेळीच त्यांना दूर करून स्वत: व समाजातील घटकांना यापासून दूर करू व कायद्याचे नियम समजावून घेऊन सायबर गुन्हेगारीपासून आपले संरक्षण करा. यासाठी आपले संरक्षण करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी व समाजातील मोठी माणसे आपल्या पाठीशी सदैव असतात हे विसरू नका.
भारत टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ या परीक्षेत विद्यालयातील कुमार शौर्य महादेव शेलार (इ.५ वी) याचा देशाच्या यादीत २८९ वा क्रमांक प्राप्त केल्या बद्दल (PI ) संभाजी गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार दराडे ,गोपाल विद्यालय पिंपळेचे मुख्याध्यापक एल.डी.बेनके,बी.आर. चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर,आर.टी.गिरी,एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.अतिथीचे आभार बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे यांनी मानले.