युवा मतदार म्हणजे देशाचे भवितव्य – प्रांताधिकारी गाढवे

0

एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालय निवडणूक साक्षरता व मतदार नोंदणी अभियान

येवला प्रतिनिधी :

 Young new voters युवा मतदार म्हणजे देशाचे भवितव्य आहे.तोच उद्याचं नेतृत्व निश्चित करत असतो.लोकशाहीत मतदारच राजा असून तो लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे.

भावी अभियंत्यांनी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाला बळकट करण्यासाठी पात्र असलेल्या सर्वानी मतदार नोंदणी आवश्यक करावी असे प्रतिपादन प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले.

बाभुळगाव येथील एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्रामध्ये आयोजित निवडणूक साक्षरता व मतदार नोंदणी अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.प्राचार्य डॉ.डी.एम. यादव,तहसीलदार आबा महाजन,महसूल नायब तहसीलदार निरंजना पराते,गटशिक्षण अधिकारी संजय कुसाळकर,निवडणूक नायब तहसीलदार नितीन बहीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी वेळी मतदार नोंदणीचे महत्त्व,नोंदणीची पद्धत,नोंदणीचे विविध फॉर्म याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

भारतीय संविधानाने १८ वर्ष वय असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे.हा मतदार मतपेटीतून आपल्या राज्यकर्त्यांची निवड करतो. मतदार नोंदणी व मतदार जागृती उपक्रम देशभर सुरू आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाची मतदार नोंदणी आवश्यक आहे. हा  अनेक मतदार आपल्या मतदानाच्या अधिकाराबाबत जागृत नाहीत. ते मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवित नाहीत. परिणामी मतदानाचा टक्का कमी होते. ही गोष्ट लोकशाहीसाठी घातक आहे,असेही गाढवे म्हणाले. 

यावेळी अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल,संगणक, स्थापत्य,माहिती तंत्रज्ञान इलेट्रीकल तसेच प्रथम वर्ष विभागाचे ३५० हुन अधिक उपस्थित होते.एकूण ३४० विद्यार्थ्यांची नव मतदार नोंदणी केली.मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन व सहभाग नोंदविला. यावेळी स्थापत्य विभागप्रमुख डॉ.यू.एस. अन्सारी,डॉ.हरजीत पवार,डॉ.पवन टापरे,डॉ. विद्या निकम,डॉ.उमेश पवार,प्रा.राहुल थोरात व  राष्ट्रीय सेवा अधिकारी प्रा.विशाल ठाकरे, जगदंबा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे व प्राध्यापक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रकाश रोकडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here