उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )
उरण रोटरी एज्युकेशन सोसायटीच्या रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चा ३४ वा वार्षिक स्नेह संमेलन भव्य सोहळा मोठया उत्साहात रोटरी एज्युकेशन सोसायटीची रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर बोरी उरण येथे पार पडला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्लोबल ऑऊट सोरसींग कंट्रोल्स लिड चे व ग्लोबल सिनिअर वाईस प्रेसिडंट, सिटी ग्रुपचे प्रसाद एस प्रधान उपस्थित होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणुन कॅप जेमिनी च्या वाईस प्रेसीडंट चित्रा एस दाते उपस्थीत होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव यतिन म्हात्रे व शाळेच्या प्रशासकीय अधिकारी पुष्पा कुरूप यांनी केले.मनिषा महाजन सदस्या यांनी प्रमुख पाहुण्याचे परिचय प्रस्तावना केली. संस्थेचे अध्यक्ष विकास महाजन यांनी प्रमुख पाहुणे प्रसाद एस प्रधान यांचे पुष्प गुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केले. तसेच पुजा म्हात्रे सदस्या यांनी सन्माननीय अतिथी यांचे परिचय प्रस्तावना केली व चित्रा एस दाते यांचे शाळेच्या प्राचार्य अक्षता घरत यांनी पुष्प गुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केले. संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष शेखर. व्दा. म्हात्रे यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच नवनिवार्चित अध्यक्ष विकास महाजन यांचे सुध्दा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रोटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विकास महाजन यांनी भुषवले होते. रोटरी इंग्लिश स्कुल व कॉलेजच्या मुलांनी संपुर्ण वर्षा मध्ये केलेल्या शैक्षणिक प्रगती, किडा, व विज्ञान प्रदर्शना मध्ये शाळेच्या मुलांनी नेत्र दीपक यश मिळवले होते त्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, सन्माननीय अतिथी, शाळेचे पदाधिकारी, विश्वस्त व सदस्यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष विकास महाजन यांनी भाषण केले आणि शैक्षणिक व क्रिडा मध्ये यश मिळवलेल्या व सत्कार केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले व अभिनंदन केले.अक्षता घरत, प्राचार्य, यांनी शाळेचा वार्षिक अहवाल पालकां समोर सादर केला. उरण शहरा मध्ये एक आधुनिक शाळा म्हणुन रोटरी स्कुल प्रगती करत आहे याची जाणीव हया स्नेह सम्मेल्लंन कार्यक्रमाच्या निमित्ताने उरण करांना मिळाली.सदर कार्यकमास रोटरी एज्युकेशन सोसायटीचे जॉईंट सेक्रेटरी शेखर व्दा म्हात्रे, खजिनदार प्रसन्नाकुमार, विश्वस्त डॉ. बी.व्ही. देवणीकर, व पालक शिक्षक संघटनाचे उपाध्यक्षा प्रिया थळी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमास पालक वर्ग व उरणच्या नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता.कार्यक्रमाच्या अंतिम क्षणी संजिता थळी- मुख्याध्यापिका यांनी उपस्थीत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सन्माननीय अतिथी, संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे आभार मानले. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी झाल्या बदल सर्व शिक्षक/कर्मचारी वर्गाचे सुध्दा आभार केले.