सिन्नर प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या गणित, इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मिळवून आपल्या प्राथमिक ज्ञानाच्या जोरावर सोडविल्या व आपल्या मार्गदर्शक शिक्षकांकडून तपासणी केली असता त्यांना ६० ते ७० टक्के ज्ञान आकलन झाल्याचे लक्षात आले. या त्यांच्या ज्ञानाचे कौतुक करतांनी बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाची चाचणी करत चला व यशाचे शिखर गाठा असे सांगितले.
या वेळी अश्विनी सोमनाथ पाटोळे हिचे विशेष कौतुक करून तिला बक्षीस देऊ केले बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक रेवगडे टि के यांनी पाचवी ते सातवी या वर्गांसाठी इंग्रजी विषयांचे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या इंग्रजी विषयाचे विशेष मार्गदर्शन केले यावेळी बी आर चव्हाण ,आर व्ही निकम ,एस एम कोटकर, एम एम शेख, सविता देशमुख, सी बी शिंदे ,के डी गांगुर्डे, एस डी पाटोळे ,आर एस डोली उपस्थित होते.