वकिल म्हणून जाती व्यवस्था मोडीत काढणे ही जबाबदारी आपली आहे.– शिवव्याख्याते विवेक भोपी

0

क्रांतीसुर्य ज्योतीबांना व क्रांती ज्योती सावित्रीबाईंनां आपेक्षीत शिक्षणक्रांती करायला हवी – शिवव्याख्याते विवेक भोपी

उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )ज्यांनी समाज सुधारण्यासाठी आपल्या  छातीवर घाव सोसले आहेत, अशाच लोकांच्या जयंती साजरी केली जाते, त्या महान व्यक्तिंपैकी एक  क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले आहेत.असे उद्गार प्रसिद्ध शिवव्याख्याते  विवेक भोपी यांनी काढले.ते बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयात आयोजीत केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

विधि महाविद्यालयाचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डाॅ.राजेश साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांची जयंती शनिवारी आयोजीत केली होती.यावेळी महावीद्यालयाच्या अनेक विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्याबद्दल आपले विचार प्रकट केले.व आदर व्यक्त केला.

यावेळी बोलताना विवेक भोपी पुढे म्हणाले,आपण महापुरुषांना जाती मध्ये बंधीस्त केलं आहे. ब्राम्हण समाजाच्या मूलाला दत्तक घेवून पुढे त्यांला डाॅक्टर बनवले त्या क्रांतीसुर्य ज्योतीबांना व क्रांती ज्योती सावित्रीबाईंना जातीव्यवस्थेत कसे बंद करता येईल.

आपण भावी वकील आहोत .त्यामूळे वकिल म्हणून जाती व्यवस्था मोडीत काढणे ही जबाबदारी आपली आहे.क्रांतीसुर्य ज्योतीबांना व क्रांती ज्योती सावित्रीबाईंनां आपेक्षीत शिक्षणक्रांती करायला हवी 

 या सुंदर अशा कार्यक्रमाला प्राचार्य डाॅ.राजेश साखरे ,प्राध्यापक डॉ  रामकृष्ण नायक, प्राध्यापक डॉ राठोड सर ,प्राध्यापिका पुजा चव्हाण , प्राध्यापिका वैशाली बोराडे  ,प्राध्यापिका, प्राजक्ता औटी तसेच मुंबई युनिव्हर्सिटी कोओर्डिनेटर अमित सूर्यवंशी  व लायब्ररी प्रमुख शकुंतला मॅडम आदी मान्यवर व विधी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here