उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ):
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महालण विभाग फुंडे येथे आरोग्य केंद्र समिती आणि लायन्स क्लब एनपीएसटी व लायन्स क्लब द्रोणागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा १८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये संपन्न झाली.
कार्यशाळेची सुरुवात प्रास्ताविक झाली, जे आरोग्य केंद्र समितीचे अध्यक्ष पंकज भोये यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी तणाव व्यवस्थापनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. आर. पाटील यांनी कुशलतेने केले, तर आभार प्रदर्शनाचे दायित्व योगेश कुलकर्णी यांनी सांभाळले. छायाचित्रांकन साठी चक्रधर घरत या विद्यार्थ्याने सहकार्य केले.
कार्यक्रम दोन सत्रांमध्ये विभागले गेले.सकाळ च्या सत्रामध्ये कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.दुपारच्या सत्रामध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले .
कार्यशाळेचे मार्गदर्शन प्रसिध्द हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी केले. त्यांनी तणाव व्यवस्थापनासाठी प्रभावी तंत्र आणि उपाय शिकवले, जसे की वेळेचे नियोजन, आत्मसजगता, आणि तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग आणि कर्मचारी वर्ग असे एकूण २४८ जण लाभार्थी होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये मीनाक्षी भटनागर, हरनीस कौर,रमाकांत म्हात्रे, विजय घनत्र , मिलिंद पाटील , संदीप म्हात्रे श्रेयस म्हात्रे , सुयोग पेंडसे, संगीता म्हात्रे, सागर चौकर, मोनिका चौकर, ऍड.दीपाली गुरव, आणि भूमिका सिंग यांचा समावेश होता.
कार्यशाळेच्या शेवटी संयोजक समितीने सर्व सहभागी, पाहुणे, आणि आयोजकांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महालण विभाग फुंडे येथील विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी मोलाचे योगदान मिळत आहे.