
माहूर येथील जिनियस किड्स स्कूल मध्ये आयोजित अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
………………………………………………………………
माहूर:- माहूर शहरातील जीनियस किड्स स्कूलमध्ये आज अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील विज्ञान प्रदर्शनात 70 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती करत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सरफराज दोसानी,पत्रकार राजू ठाकुर, असीम अकबानी,नानूसिंग राठोड़,रेणुका महाविद्यालयाचे विज्ञान विषय तज्ञ वी.जी.गिरी, प्रा.गोचले सर,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले.
बंजारा समाजाची वेशभूषा, परंपरा, संस्कृती चे दर्शन व्हावे म्हणून विज्ञान प्रदर्शनात ओवी चेतन राठोड या विद्यार्थिनी कडून बंजारा पेहराव्याची प्रदर्शनी मांडण्यात आली होती.ही प्रदर्शनी आकर्षक ठरली.
विज्ञानाचा वापर करून दैनंदिन जीवनातील कामे सुसह्य बनविणारी साधने, विज्ञानाच्या आधारे पर्यावरण संवर्धन करू शकणारी यंत्रणा आणि मोबाइल चार्जिंगपासून ध्वनी व हवा प्रदूषण रोखणाऱ्या यंत्रापर्यंतचा आविष्कार शालेय मुलांनी वैज्ञानिक उपकरणातून उलगडला आहे.विद्यार्थ्यांनी लहानसहान वस्तूंचा वापर करत घडविलेला आविष्कार पाहून प्रमुख पाहुणे ही भारावले.
विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन वैज्ञानिक घडण्यास सुरुवात होईल.शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती भावी काळात विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देणाऱ्या ठरतील असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ पत्रकार वसंतरावजी कपाटे यांनी यावेळी केले. . .
शालेय विज्ञान प्रदर्शन हा प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना विज्ञाना विषयी आवड निर्माण करणारा उपक्रम आहे,नवीन वैज्ञानिकांची बीजे अशा प्रदर्शनातून रोवली जातात. या विद्यार्थ्यांमधूनच भविष्यात संशोधक, शास्त्रज्ञ घडतील.असे मत पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांनी व्यक्त केले.
या वेळी जिनियस किड्सचे प्राचार्य सुधीर गौरखेडे, शीतल भवरे,प्रफुल भवरे,आकाश भवरे, शुभम भवरे,आयफाज शेख,प्रशांत देशमुख, शुभम गायकवाड, आकाश राठोड, सोहेल खान,राहुल गिऱ्हे, राजू गुलफूलवार, वैभव मुडणकर, विक्रांत चव्हाण, वर्षा कऱ्हाळे, पल्लवी पाटील, प्रतिभा पाटील,रचना निळे, पूजा कुंभारे, रितू वर्मा, मनीषा खाडे, अल्का राठोड, दातीर, अश्विनी भास्करवार, करिष्मा राठोड, रसिका राठोड, प्रियांका खांडेकर, प्रियांका वांगे, जानकी आराध्ये,संगीता ताई,लक्ष्मीताई यांची उपस्थिती होती.