येवला :सुरेगाव (रस्ता) येवला येथील समता प्रतिष्ठान संचलित समता माध्यमिक विद्यालयात शिकणारे विद्यार्थी ऋषिकेश मोरे व अदिती आढाव यांनी आपल्या जन्म दिवशी आपल्या शाळेला विद्यार्थी उपयोगी महत्वाचे पुस्तकं व टिकाव फावडे भेट दिले.
समता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी आपल्या वाढदिवशी नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतात.शाळा व विद्यार्थी मित्र मैत्रिणींची गरज लक्षात घेऊन या पूर्वी अनेक ग्रंथ वाचनीय पुस्तकं, महापुरुष व महामाता यांच्या फोटो-प्रतिमा विद्यार्थ्यांनी भेट दिल्या आहेत.
शाळेस भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचे समता प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे,सरचिटणीस दिनकर दाणेसर,मुख्याध्यापक जी.एल.जाधवसर,हरिभाऊ सोनवणेसर,हरिभाऊ भागवतसर,शरद शेजवळसर,व्ही.डी.सोनवणेसर, हिरामण पगारसर,बाबासाहेब गोविंदसर,शिक्षकेत्तर कर्मचारी भाऊसाहेब झालटे,लक्ष्मण दाणे व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.