वेतनेत्तर अनुदानासाठी लेखा परिक्षण सक्तीचे करू नये : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

0

नाशिक :अनुदानासाठी लेखा परिक्षण सक्तीचे करू नये अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने निवेदनाद्वारे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे . आपल्या निवेदनात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने पुढे म्हटले आहे की नुकतेच शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी शाळांना वेतनेत्तर अनुदान वाटपासाठी मागील चार वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल(आँडीट) मागवले आहे . त्याची मुदत २२ -२३ मे अशी आहे . मात्र यादरम्यान सुट्याचा कालावधी आहे . तसेच लेखाधिकारी संजय खडसे यांची औरगाबाद येथे बदली झालेली आहे . नवीन येणारे लेखाधिकारी रुजु झालेले नाही . अशा परिस्थितीत आँडीट कोण करेल असा प्रश्न आहे सध्या मुख्याध्यापक , लिपीक आधार अपडेट व संच मान्यतेच्या कामात आहेत . त्यामुळे इतक्या घाईघाईने हे काम होण्यासारखे नाही अशा परिस्थितीत गेल्या १५ वर्षा पासुन मागील लेखाधिकाऱ्यांनी एकाही शाळाचे लेखा परिक्षण केले नाही . तसेच शासनाने गेल्या २००७ – ते २०१४ या वर्षाचे वेतनेतर अनुदान दिलेच नाही . तरी आता आहे त्या परिस्थितीत लेखा परिक्षणासाठी मुदतवाढ मिळावी अशा आशयाचे निवेदन शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांना मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी . देशमुख , अनिल माळी, पी . एम . पेन्ढारी , अनिल गागुर्डे , महेन्द्र जोंधळे यांनी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के . सावंत यांच्या मार्गदर्शना खाली शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले . यावेळी दोन दिवसाच्या आत वेतनेत्तर अनुदान मुख्याध्यापकांच्या खाती जमा करण्याचे अश्वासन शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी दिले व मुख्याध्यापकांनी लवकरात लवकर लेखा परिक्षण करून घ्यावे अशी सूचनाही पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here