सावरगाव विद्यालयात सेमीचा निकाल १०० टक्के,अर्जुन गोराणे प्रथम
येवला प्रतिनिधी
शाळा अन शेती काम करून कुटुंबाला मदत करायची अन उरलेल्या वेळात अभ्यास करायचा…अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आवड जोपासत सावरगाव विद्यालयात शेतकरी पुत्रांनी अव्वल यश संपादन केले आहे.अर्जुन गोराणे या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला.
सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा सेमी माध्यमाचा निकाल १०० टक्के तर एकत्रित निकाल ९७.२७ टक्के लागला.अतिशय प्रतिकूलतेवर मात करत कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे पेलवत शेतीसाठी मदतीचा हात देतानाच घरची जवाबदारीही निभावत विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहेत.
मागील वर्षी विद्यालयात इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र मंजूर झाल्यानंतर परीक्षेचे पहिलेच वर्षं असतांना पूर्ण परीक्षा अतिशय सुरळीत पार पडली तसेच निकालही घवघवीत लागला असून विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.विद्यालयाचे ११० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते,यातून ५६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
केंद्र प्रमुख असलेले नानासाहेब गोराने यांचा मुलगा अर्जुन गोराणे याने ९१.६०% मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.शेती कामाची जवाबदारी सांभाळत व आई वडिलांच्या अपेक्षाची पूर्ती करत ओम काकड ओम व समर्थ काटे यांनी ८९.६० % मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला.रेणुका भुजबळ या विद्यार्थ्यांनीने ८८.८० % गुण मिळवून तृतीय तर समीक्षा डुंबरे हिने (८८.६० %) चतुर्थ व गव्हाणे गायत्री (८८.२०%) हिने पाचवा क्रमांक मिळवला.विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थीनी शेतकरी कुटुंबातील असून शेतीकाम, घरकामाची जवाबदारी सांभाळून मिळालेल्या वेळेत त्यांनी हे यश मिळवले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा पाटील,सहसचिव प्रविणदादा पाटील,युवा नेते संभाजीराजे पवार,माजी सरपंच प्रसाद पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांचे प्राचार्य एम.एम. अलगट,पर्यवेक्षक आर.जी.पैठणकर,गजानन नागरे,वाय.ए.दराडे,योगेश भालेराव,उमाकांत आहेर,पोपट भाटे,कैलाश मोरे,सुमेध कुऱ्हाडे,अंजना पवार,संतोष विंचू,लक्ष्मण माळी,योगेश पवार,रविंद्र दाभाडे,संजय बहीरम,उज्वला तळेकर,भाग्यश्री सोनवणे,सगुना काळे,सविता पवार,अर्चना भुजबळ,रोहिणी भोरकडे, प्रमोद दाणे,विकास व्यापारे,मयुरेश पैठणकर,रोहित गरुड,निलेश व्हनमाने,सागर मुंढे,मच्छिंद्र बोडके,लक्ष्मण सांगळे,आकाश नागपूरे आदी मार्गदर्शक शिक्षकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.