वाणिज्य शाखेचा 98.68 टक्के निकाल .कला शाखेचा 82.35 टक्के निकाल
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
देवळाली प्रवरा येथिल अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे श्री.छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला, शास्ञ व वाणिज्य विभागाच्या इयत्ता बारावीचा शास्ञ शाखेचा 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा 98.63 टक्के तर कला शाखेचा 82.35 टक्के निकाल लागला आहे.शास्ञ शाखेत ईश्वरी बाळासाहेब वाळके 551गुण मिळवून प्रथम क्रमांक तर वाणिज्य शाखेत सायली धिरज गांधी 529 गुण मिळून प्रथम क्रमांक व कला शाखेत सोनल अशोक कोरेकर 397 गुण मिळून प्रथम क्रमांक पटकवला आहे.
देवळाली प्रवरा येथिल श्री.छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शास्ञ व वाणिज्य शाखेच्या बारावीचा निकालाची परपरा कायम राखत शास्ञ शाखेत ईश्वरी बाळासाहेब वाळके 551 गुण मिळवून प्रथम क्रमांक तर प्रणीती संतोष मुसमाडे 515 गुण मिळवून द्वितीय क्रमांक व माधुरी बाबासाहेब तांबे 503 गुण मिळून तृतीय क्रमांक पटकवला आहे. वाणिज्य शाखेत सायली धिरज गांधी 529 गुण मिळवून प्रथम क्रमांक तर साहिल हबीब सय्यद 456 गुण मिळवून द्वितीय क्रमांक व वृषाली शिवाजी देशमुख 436 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला आहे.कला शाखेत सोनल अशोक कोरेकर 397 गुण मिळवून प्रथम क्रमांक तर स्वप्नाली अनिल कांबळे 391 गुण मिळवुन द्वितीय क्रमांक व प्रतिक्षा सुनिल खरात 379 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटवला आहे.
विद्यालयातील शास्ञ शाखेतुन 165 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.165 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शास्ञ शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे.कला शाखेतुन 68 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 56 विद्यार्थी उत्तीर्ण होवुन 82.35 टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेतुन 73 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.त्या पैकी 72 विद्यार्थी उत्तीर्ण होवुन 98.63 टक्के निकाल लागला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य बाबासाहेब चव्हाण यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.