संजीवनीच्या तीन अभियंत्यांना सॅप प्रमाणित कोर्सद्वारे टीसीएसमध्ये नोकरी

0

संजीवनीत घडताहेत आधुनिक तंत्रज्ञानाधिष्टित  अभियंते
कोपरगांव प्रतिनिधी : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऑटोनॉमस दर्जा असल्यामुळे उद्योग जगताला अभिप्रेत असलेल्या आधुनिक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव केलेला आहे. याच बरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने सॅप (सिस्टिम्स, अॅप्लिकेशनस् अँड  प्रॉडक्टस् ईन डेटा प्रोसेसिंग) या बहुराष्ट्रीय  सॉफ्टवेअर कंपनीशी  सामंजस्य करार केलेला आहे. या सॅप प्रमाणित कोर्सच्या आधारावर टाटा कन्सलटंसी सर्विसेस ( टीसीएस ) कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील  तीन अभियंत्यांची आकर्षक  पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी  माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
           

टाटा समुहाची टीसीएस ही बहुराष्ट्रिय कंपनी असुन अनेक देशात  कार्यरत आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने टीसीएस कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या समिक्षा नंदकुमार भालेराव, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या निलेश  बाळासाहेब अहिरे व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या दिप्ती संजय टुपके यांची नोकरीसाठी निवड केली आहे.
           

मागिल वर्षीही  सॅपचा कोर्स केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळाल्या होत्या. अभियांत्रिकीचे शिक्षण  पुर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थी सॅप सारखे कोर्स करण्यासाठी मोठ्या शहरात जातात. परंतु संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले विद्यार्थी पदवी पुर्ण करीत असतानाच सॅपचे प्रशिक्षण  देण्याची सोय केलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांची वेळेची व पैशांची  बचत होत आहे.
          संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here