नाशिक : येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात नुकतेच वर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी एल डी सोनवणे यांनी येथे सहाय्यक उपसंचालक पदी बदलीवर नियुक्ती करण्यात आली.
नाशिकचे भूमिपुत्र असलेले एल डी सोनवणे यांनी यापूर्वी नाशिक जिल्ह्या परिषदेत उपशिक्षणाधिकारी म्हणून काम केलेले आहे.
आज त्यांचा मुख्याध्यापक संघातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी बोलतांना सांगितलं की मी यापूर्वी नाशिक जिल्ह्यात उपशिक्षणाधिकारी म्हणून काम केलं असल्यामुळे येथील संस्था व शिक्षक यांच्या समस्यांची मला जण आहे त्यामुळे त्या सोडवण्यासाठी नक्कीच सहकार्य करीन.
एल डी सोनवणे यांची नाशिक येथे सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती झाली त्यांचे स्वागत व सत्कार करतांना यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत, कार्याध्यक्ष . एस . बी . शिरसाट, सचिव एस बी देशमुख,उपाध्यक्ष प्रदिप सांगळे , श्रीम. परवेझा शेख , पुरुषोत्तम रकीबे, बी के नागरे, शहर कार्यवाह शरद गिते, बी के गांगुर्डे, इरफान शेख ,के डी देवढे, दीपक पवार , बी . डी . घोडेराव , एस. आर . धिवरे , जे . डी जाधव , दशरथ जारस , शरद गिते , पी .टी . जाधव , डी .के . गायकवाड , ए . एन . घोडेराव , एम व्ही, श्रीके डी देवढे , विनायक पाटील , ,श्रीम. संगिता बाफणा, रौंदळ बी डी, बाबा खरोटे, श्रीम. रोडे के एस श्रीम . जिरे एस डी , प्रकाश पानपाटील ,एम व्ही कुंवर, जे आर गायकवाड, ए एस विंचु, उत्तम सांगळे, महेंद्र जोंधळे, मयुर आव्हाड इतर पदाधिकारी उपस्थित होते.