सिन्नर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. ५ व ६ जानेवारी २०२३ इरा इंटरनॅशनल स्कुल येथे होणार

0


सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित , सर्व आस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांची सहविचार सभा शुक्रवार दिनांक 17/12 /2022 रोजी दुपारी इरा इंटरनॅशनल स्कूल (इरा विन्टरनॅशनल SCHOOL) अजिंक्यतारा हॉटेल समोर सरदवाडी रोड येथे नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघांचे सचिव देशमुख एस. बी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते म्हणाले सिन्नर तालुक्यात ७५ माध्यमिक व ५० पेक्षा जास्त प्राथमिक शाळांचा सहभाग असणार आहे. हे विज्ञान प्रदर्शन ऐतिहासिक होणार असुन आपण जिल्हा विज्ञान प्रदर्शनाची ही तयारी करत आहोत येथे सुसज्ज इमारत व सर्व अद्यावत भौतिक सुविधा आहेत . या सहविचार सभेस,मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व गणित -विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील विज्ञान गणित शिक्षक उपस्थित होते. या सहविचार सभेत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन व नियोजनसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या शैक्षणिक वर्षांचे सिन्नर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि ५ व ६ जानेवारी २०२३ रोजी घेण्याचे ठरविण्यात आले, या वेळी सुकानू समिती, नोंदणी समिती, मांडणी समिती, स्वागत समिती, पारितोषिक वितरण समिती, स्टेज समिती, चहापान व भोजन समिती, प्रसिद्धी समिती, अर्थ समिती, अशा समित्या गठीत करण्यात आल्या. तसेच जिल्हास्तरावर निरीक्षक म्हणून, एस जी पगार, आर आर महात्मे, व्ही बी पवार, आर टी गिरी, एल एन शेळके, जे जी सय्यद, महाजन एम बी यांची नेमणूक करण्यात आली. या सभेस विज्ञान गणित अध्यापक संघांचे अध्यक्ष एस एस गाडेकर, आर बी एरंडे ,व्ही.एस शिंदे ,एन .एम. खैरनार , कार्याध्यक्ष एस टी पांगरकर , मुख्याध्यापक संघाचे रामनाथ लोंढे , एम.डी. काळे .डी.पी.कामडी , विज्ञान अध्यापक संघाचे एस एल कराड , राजेंन्द्र महात्मे , बी एस आव्हाड, बी पी खुळे , जे के बडगुजर , बी सी गुरुळे , श्रीम. गंगावणे मॅडम, श्रीम. महाले मॅडम, श्रीम. बोडके मॅडम, पाटील मॅडम, कांगणे सर, बागुल* *सर, पगार सर उपस्थित होते. प्रास्ताविक श्री गाडेकर एस एस यांनी केले मार्गदर्शन श्री एस बी देशमुख यांनी तर एस टी पांगरकर यांनी मनोगत व्यक्त केले .आभार एस जी पगार सर यांनी मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here