एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्रविणकुमार शेंडे यांचे व्याख्यान संपन्न 

0

हडपसर प्रतिनिधी :

एस. एम. जोशी कॉलेज मधील ज्युनिअर विभागाने  विद्यार्थ्यांसाठी ‘स्मरणशक्ती आणि अभ्यास तंत्र’ या विषयावर डॉ. प्रवीणकुमार शेंडे यांचे  मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ.किशोर काकडे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.प्रवीणकुमार शेंडे म्हणाले परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी काय करावे. अभ्यास करताना कंटाळा येणे, अभ्यास केलेला लक्षात न राहणे, अभ्यास करताना  झोप येणे. आशा अभ्यासासातील अडथळ्यांवर मात कशी करावी. इतर  प्रश्नांसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यावर उपाययोजना ही सुचविल्या. विद्यार्थ्यांना 8 वर्षांपूर्वीचा चित्रपट सहज आठवतो पण अभ्यास का लक्षात राहत नाही. याबद्दल विद्यार्थ्यांना नेमकेपणाने मार्गदर्शन केले. मानवी  मेंदूला चित्रांची भाषा जास्त समजते. अभ्यास खूप सोपा आहे. पण तो विद्यार्थ्याने व्यवस्थितपणे समजावून घेतला पाहिजे. असे मत डॉ. प्रवीणकुमार शेंडे यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. झाडबुके यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय ज्युनिअर विभागप्रमुख प्रा.तृप्ती हंबीर  यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा.गणेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी ज्युनिअर विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here