कलाशिक्षक महासंघाच्या जिल्हा सहसचिवपदी अजय पावटेकर तर संघटकपदी बापुसाहेब वाघ 

0

संतोष राऊळ यांची येवला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

येवला, प्रतिनिधी :

 राज्य कलाशिक्षक महासंघाने नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून येथील कलाशिक्षक अजय पावटेकर यांची जिल्हा सहसचिवपदी,बापुसाहेब वाघ यांची जिल्हा संघटकपदी तर संतोष राऊळ यांची येवला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक अजय पावटेकर यांची राज्य कलाशिक्षक महासंघ नाशिक जिल्हा सहसचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.मविप्रचे जनता विद्यालय मुखेड शाळेचे कलाशिक्षक बापुसाहेब वाघ यांची महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे नाशिक जिल्हा संघटक या पदावर बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे कलाशिक्षक संतोष राऊळ यांची महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात उल्लेख केला आहे की,कलाशिक्षकांप्रती विविध अडी-अडचणी सोडवणे, कला हा आपला विषय शालेय अभ्यासक्रमात टिकावा यासाठी आपण करत असलेली धडपड व कलाक्षेत्रासाठी देत असलेले विविध उपक्रमातील योगदान तसेच राज्य कलाशिक्षक महासंघाच्या प्रामाणिक व अभ्यासपूर्ण निवेदनांव्दारे करण्यात येत असलेले शासन दरबारी विविध पाठपुरावे व त्यावर येत असलेला सक्षम निर्णय यातून प्रभावीत होऊन कलाशिक्षक महासंघाच्या प्रदेश कार्यकारणीच्या छत्रछायेखाली नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य कलाशिक्षक महासंघाच्या घटनात्मक नियम, ध्येय धोरणा नुसार आपल्याला सर्व नियम पाळणे बंधनकारक असून शिक्षकांच्या हितासाठी जोमाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद साळुंके, प्रदेश सदस्य दत्तात्रय सांगळे , चंद्रशेखर सावंत, सचिन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची नियुक्ती करण्यात आलेली असून प्रदेश सरचिटणीस कलाशिक्षक महासंघ प्रल्हाद शिंदे (हस्तेकर) यांनी अनुमोदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here