ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी मी कटिबद्ध : रश्मी हिरे

0

सिन्नर : ग्रामीण भागातील गुणी विद्यार्थी बघून मला माझे बालपण आठवले व मला विद्यार्थ्यांच्या भौतिक हितासाठी काम करण्याची आवड आहे.ग्रामीण भागातील मुलींसाठी आरोग्याच्या व स्पर्धा परीक्षाच्या उपक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या या शाळेसह विद्यार्थ्यांना सतत आर्थिक मदत करत राहील. मुलींच्या आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यास मी सदैव तयार असेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या रश्मी हिरे यांनी केले. रश्मी हिरे यांनी नुकतीच पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयास भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या , त्या पुढे म्हणाल्या की सुंदर,संपन्न व स्वच्छ शाळा बघून मला खुप आनंद झाला. तुमची शाळा निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे येथे तयार होणारे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न आहे. येथील नैसर्गिक वातावरण इमारत खूपच छान आहे. विद्यालयाचा देखणा परिसर व निसर्ग सानिध्य बघून समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना उद्बोधित करतांना तुमची शाळा व तुम्ही खुप सुंदर आहात अशा सुंदर वातावरणात खरोखरच शिक्षणासाठी प्रेरक वातावरण निर्माण होऊन तुमचे लक्ष सातत्याने अभ्यासात लागणे क्रम प्राप्त आहे. तुमची शिस्त बघून शहरी भागातील शाळेस लाजवेल अशी निश्चित आहे.तुमच्याशी हितगुज साधून मला मनस्वी खुप आनंद झाला मी माझ्या पक्ष कार्यातून तुमच्यासाठी निश्चितच भेट देईन.
पाडळी गावचे प्रथम नागरीक सौ.सुरेखा सुधीर रेवगडे यांनी असंघटीत कुशल कामगारांच्या आरोग्य हितासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून गरीब कुटुंबातील प्रत्येक घटकाची आरोग्य तपासणी करण्याच्या हेतूने नाशिकच्या आरोग्य पथका- कडून आरोग्य तपासणी केली या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर रश्मी हिरे, मनोज शिरसाठ,दर्शन भालेराव, जयंत आव्हाड,प्रमोद शिंदे,सुधीर रेवगडे यांनी विद्यालयास भेट देऊन समाधान व्यक्त केले.
मनोज शिरसाठ भाजपा अध्यक्ष सिन्नर तालुका यांनी तालुक्यातील विविध शाळांसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवितो.तुमच्या गुणी विद्यार्थ्यांसाठी आम्ही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून बक्षिसे देऊअसे सांगितले.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी आज रश्मी हिरे यांनी विद्यालयास भेट देऊन मुलींना आपण खंबीर बना,अंगी ध्येर्य बाणा व खुप यशवंत गुणवंत व्हा. असा मौलिक सल्ला देऊन आमच्या विद्यालयातील मुलींना प्रेरणा दिली.आपण विद्यालयास भेट देऊन मुलींनी आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्व व त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा असा संदेश दिला.याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर,आर.टी.गिरी,एम.सी.शिंगोटे.एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे, एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here