समता फेस्टिवल मधून विद्यार्थ्यांनी दिला मानवता धर्माचा संदेश
सुरेगाव (रस्ता) येवला :
येथील समता प्रतिष्ठान संचालित समता माध्यमिक विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधाकडे लक्ष देऊन दातृत्व भावनेतून येथील जेष्ठ गणित विषय शिक्षक हरिभाऊ ज.सोनावणे यांनी आपल्या आई स्मृतिशेष गं.भा.सीताबाई जगन्नाथ सोनावणे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी शाळेस भेट देऊन माणुसकीचा धर्म पाळला असून जलदान हेच खरे जीवनदान असल्याचे मत समता प्रतिष्ठान येवलाचे अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे यांनी व्यक्त केले.
समता फेस्टिवल हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावदेणार वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रा.अर्जुन कोकाटे अध्यक्ष पदावरून बोलत होते.समता फेस्टिवल चे उदघाटन बारामती ऍग्रो चे व्यावस्थपक सचिन सातभाई यांच्या हस्ते करण्यात आले. पूज्य सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी दिला खरा धर्म हे पथनाट्य सादर करून मानवाचा खरा धर्म मानवता माणुसकी,सत्य,शील,करुणा हाच असल्याचा संदेश दिला. समता फेस्टिवल अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सामाजिक,देशभक्ती,प्रबोधन गीत,नाट्य,संविधान कीर्तन,हिंदी कव्वाली,कालांमधून सामाजिक समता,लोकशाही, स्वातंत्र्य,धर्मनिरपेक्षता,अंधश्रद्धा निर्मूलन पर सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजनातून लोकप्रबोधन व लोकशिक्षण देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे उदघाटन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व झाडाच्या रोपट्याला पाणी देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुरेगाव (रस्ता) ग्रामपंचायत सरपंच सौ.मोहिनी आहेर,उपसरपंच सौ.लताबाई पगारे,बारामती ऍग्रो चे व्यावस्थपक सचिन सातभाई,समता प्रतिष्ठान येवला सरचिटणीस दिनकर दाणेसर, पोलीसपाटील राजेंद्र गायके,वि. वि.का.सोसायटीचे चेअरमन गजानन चव्हाण, व्हा,चेयरमन माधवराव गायके,पोलिस पाटील शब्बीर भाई शेख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी शिंदे यांनी केले,सूत्रसंचालन ऋतुजा मगर,रुणाली पगारे,प्रांजल गायके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक हरिभाऊ सोनावणे, हरिभाऊ भागवत,हिरामण पगार, शरद शेजवळ,विनोद सोनावणे,बाबासाहेब गोविंद,विश्वास जाधव यांनी परिश्रम घेतले. आभार हरिभाऊ भागवत यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी,पालक पंचक्रोशीतील नागरिक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.