*दिनांक :~ 05 जाने 2023**वार ~ गुरूवार*
*आजचे पंचाग*
*पौष. 05 जानेवारी*
*तिथी : शु. चतुर्दशी (गुरू)*
*नक्षत्र : मृग,*
*योग :- शुक्ल*
*करण : गर*
*सूर्योदय : 06:56, सूर्यास्त : 05:52,*
*सुविचार*
*आपल्या आयुष्यात आपण विजयातून थोडे, तर पराभवातूनच बरेच काही शिकत असतो.*
*म्हणी व अर्थ*
*आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?*
*अर्थ:- आधीच विचित्र बुध्दीचा तशात भलतेच प्रोत्साहन मिळाले, तर त्याच्या चेष्टांना ऊत येतो.*
*दिनविशेष*
*या वर्षातील 05 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना*
*१६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.*
*१८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.*
*१९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.*
*१९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.*
*१९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.*
*१९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.*
*जन्मदिवस / जयंती*
*१५९२: ५ वा मुघल सम्राट शहाजहान यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)*
*१८५५: अमेरिकन संशोधक व उद्योजक किंग कँप जिलेट यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९३२)*
*१९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च २००७)*
*१९२२: आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)*
*१९५५: पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.*
*१९८६: हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.*
*१९४३: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)*
*१९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.*
*१९८२: भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१८)*
*१९९२: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१४)*
*२००३: पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन*
*सामान्य ज्ञान*
*रिकी पाँटिंग ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबधित आहे?*
*आंतरराष्ट्रिय क्रिकेटपटू*
*तामिळनाडू ची राजधानी कोणती आहे?*
*चेन्नई*
*एका वर्षात प्रकाश जे अंतर चालतो त्याला काय म्हणतात?*
*एक प्रकाशवर्ष*
*पृथ्वीवरील गुरुत्वकर्षन शक्ती नाहीशी झाली तर काय परिणाम होईल?*
*सर्व वस्तू हवेत तरंगतील*
*राष्ट्रीय युवक दिन (स्वामी विवेकानंद जन्म दिवस) केंव्हा असतो?*
*12 जानेवारी* ————————————
*बोधकथा *
*राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र*
राजा जनक राजा असूनही त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे. एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवा त्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’*
*तात्पर्य:- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.*
श्री. एस. बी. देशमुख : *मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*
*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,* *सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*
_सौ . सविता देशमुख उपशिक्षिका , पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता .सिन्नर_ *7972808064*