परीपाठ
सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता सिन्नर 9970860087
_*❂ 📆दिनांक :~ 01 जुलै 2023 ❂*_
❂🎴 वार ~ शनिवार 🎴❂
_*🏮 आजचे पंचाग 🏮*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आषाढ. 01 जुलै
तिथी : शु. त्रयोदशी (शनि)
नक्षत्र : अनुराधा,
योग :- शुभ
करण : कौलव
सूर्योदय : 05:51, सूर्यास्त : 07:09,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
💡कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा रुबाब वेगळाच असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜
📌अडला हरी गाढवाचे पाय धरी.
🔍अर्थ:-
थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खांची मनधरणी करावी लागते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆
🌞या वर्षातील🌞 182 वा दिवस आहे.
🚩महाराष्ट्र कृषी दिन
👨⚕️राष्ट्रीय डॉक्टर दिन
🇮🇳भारतीय स्टेट बैंक स्थापना दिवस
_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_
👉१६९३: संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
👉१८३७: जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली
👉१९६४: भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना करण्यात आली.
👉१९६६: कॅनडा – देशात पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण सुरु झाले.
👉१९७५: भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २० सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली.
👉१९९१: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला ’वॉर्सा करार’ संपुष्टात आला. परस्पर संरक्षणाचा हा करार ’नाटो करारा’ला प्रतिशह देण्यासाठी १४ मे १९५५ रोजी करण्यात आला होता.
👉२००७: इंग्लंड – देशात सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.
👉२०१५: डिजिटल इंडिया – या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
👉२०१७: देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण सुधारणा म्हणून वस्तू व सेवाकर (जीएसटी) संपूर्ण भारतात लागू करण्यात आला.
_*💐जन्मदिवस / जयंती💐*_
👉१८८२: डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (मृत्यू: १ जुलै १९६२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
👉१९३८: प्रख्यात भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील महान बासुरी वादक, संगीत दिग्दर्शक आणि थोर शास्त्रीय कलाकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्मदिन.
👉१९४९: वेंकय्या नायडू – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, भारताचे १३वे उपराष्ट्रपती
👉१९६१: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)
👉१९६६: उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक
👉१९६८: पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदुस्थानी संगीत परंपरेतील रामपूर-साहसवान घराण्यातील शास्त्रीय संगीतकार उस्ताद रशीद खान यांचा जन्मदिन.
👉१९७३: साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तसचं, उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव यांचा जन्मदिन.
_*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_
👉१८६०: चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (जन्म: २९ डिसेंबर १८००)
👉१९३८: गणेश श्रीकृष्ण तथा ‘दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ’वर्हाडचे नबाब’ (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)
👉१९४१: सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री (जन्म: १० एप्रिल १८८० – विजयनगरम, आंध्र प्रदेश)
👉१९६२: पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष (जन्म: १ ऑगस्ट १८८२)
👉१९६२: डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (जन्म: १ जुलै १८८२ – पाटणा, बिहार)
👉१९६९: मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार
👉१९७१: सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग (ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता, )
👉१९८९: प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ, ’माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ’देवा तुझे किती, सुंदर आकाश’, ’डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत. (जन्म: ? ? ????)
👉१९९९: एम अँड एम चे संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९०४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
👉चिपको आंदोलन कशासाठी प्रसिद्ध आहे?
🥇 वृक्ष संरक्षण
👉जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करतात?
🥇5 जून
👉कोणत्या वनस्पती पासून हिरवळीचे खत तयार होते?
🥇ताग
👉भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणते नैसर्गिक बंदर आहे?
🥇मुंबई बंदर
👉कोलंबो हे राजधानीचे शहर कोणत्या देशातील आहे?
🥇श्रीलंका
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻
🙏’संस्कार 🙏
*गावातल्या आडावर 3 बायका पाणी भरत होत्या..
त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता. तर त्याला पाहुन ती म्हणाली,
“तो बघा माझा मुलगा,
इंग्लिश मेडियामला आहे.”
*पुन्हा त्यानंतर दुसरीचा*
मुलगा तिथुन निघाला होता..
तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली,
“तो बघा माझा मुलगा, सीबीएसई ला आहे.”
तेवढ्यात तिसरीचा मुलगा
तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला… पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला,
“आई चल घरी.”
त्याची आई म्हणाली,
“मराठी शाळेत शिकत आहे .”
आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी दोघींच्या नजरा खाली गेल्या.
🧠तात्पर्य :-
लाखो रुपये खर्चून देखील ‘संस्कार’ विकत घेता येत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर.
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸