❂ दिनांक :~ 06 मार्च 2023 ❂
🎴 वार ~ सोमवार 🎴
*🏮 आजचे पंचाग 🏮*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन. 06 मार्च
तिथी : शु. चतुर्दशी (सोम)
नक्षत्र : मघा,
योग :- सुकर्मा
करण : विश्टी
सूर्योदय : 06:52, सूर्यास्त : 06:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖋 सुविचार 🖋
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
💡तुलनेच्या विचित्र खेळात अडक़ु नका, कारण या खेळाला अंत नाही..! जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜
📌पाय धु तर, म्हणे तोडे केवढ़याचे.
🔍अर्थ:–
सांगीतलेले काम सोडून इतर चौकशा करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆
🌞या वर्षातील🌞 65 वा दिवस आहे.
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
👉१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले
👉१९१५: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर शांतीनिकेतन येथे पहिल्यांदा भेटले.
👉१९५३: मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.
👉१९८३: आजच्या दिवशी १९८३ ला युनाटेड स्टेट ने पहिल्या फुटबॉल लीग ची स्थापना केली.
👉१९९२: ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.
👉१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड
👉१९९९: जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन
👉२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
👉२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
👉१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.
👉१९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.
👉१९३३: भारतीय चित्रपट अभिनेत्री कृष्णा कुमारी यांचा जन्म.
👉१९६५: देवकी पंडीत – गायिका
👉१९९७: भारतीय चित्रपट अभिनेत्री जानव्ही कपूर चा जन्म
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
👉१९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.
👉१९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.
👉१९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)
👉१९८१: गो. रा. परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, ’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य
👉१९८२: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष
👉१९९२: प्रसिध्द कादंबरीकार रणजित देसाई. कर्तबगार प्रशासक स.गो.बर्वे.
👉१९९५: दक्षिण भारतात हिंदी भाषेचे प्रचारक मोटूरि सत्यनारायण यांचे निधन.
👉१९९९: सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते
👉२०००: नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
👉हिन्द केसरी हा चषक कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे?
🥇कुस्ती
👉दासबोध हा प्रसिद्ध ग्रन्थ कोणाचा आहे?
🥇संत रामदास
👉आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते?
🥇पंडित जवाहरलाल नेहरू
👉बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय?
🥇मुरलीधर देवीदास आमटे
👉वि.वा.शिरवाडकर यांचे टोपन नाव काय?
🥇कुसुमाग्रज
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🕸 बोधकथा 🕸
🤴तर मी तुझा मुलगा उठवीन
लोकांच्या उध्दारासाठी गावोगाव फिरत फिरत भगवान बुध्ददेव एका गावी गेले . त्या गावी त्यांचा मुक्काम असतानाच, त्या गावातील एका बाईचं मुल मेलं. मुलाचं शव घेऊन ती बाई भगवान बुध्दांकडे गेली व ते शव त्यांच्यापुढं ठेवुन त्यांना म्हणाली, ‘भगवन् ! आपला मुक्काम आमच्या गावात असताना माझं मूल मरतं, याचा अर्थ काय ? आपण त्याला जिवंत केलं पाहीजे.’
चार समजुतींच्या गोष्टी सांगूनही बाई ताळ्यावर येत नाहीसे पाहुन बुध्ददेव तिला मुद्दाम म्हणाले, ‘माई, तु या गावात फिर, आणि ज्या घरात आजवर कुणीच माणूस मेलेलं नाही, अशा घरातून मूठभर गहू मागून ते मला आणून दे. मी ते गहू मंत्रवून तुझ्या मुलाच्या अंगावर टाकीन आणि त्याला जिवंत करीन.’ बुध्ददेवांचे हे आश्वासन ऎकून ती बाई मोठ्या आशेनं त्या गावातल्या घरोघरी गेली, आणि तिनं प्रत्येक ठिकाणी चौकशी केली, पण तिला अंस एकही घर आढ्ळून आलं नाही, की जिथे आजवर कुणीच मेलेलं नाही !
*एका घरी चौकशी केली असता त्या घरातील बाई म्हणाली, 'दोनच महिन्यापूर्वी काळानं माझ्या धन्याला भरल्या घरातून ओढुन नेलं! दुस-या घरातला पुरुष डोळे पुशीत म्हणाला, चारच महिन्यांपूर्वी माझी गुणी बायको, पाच कच्च्याबच्च्यांना माझ्या हवाली करुन परलोकी गेली !' कुठे कुणाच्या घरात कुणाचा चुलता, कुणाची चुलती, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, बाप वा आई, केव्हा ना केव्हा गेलेलेच होते.*
*या प्रकारानं निराश झालेली ती बाई परत बुध्ददेवांकडे गेली व त्यांना म्हणाली, 'भगवन ! गावातल्या घराघरात गेले, पण ज्या घरी कधीच कुणी मेले नाही, असे घरच मला आढळून आले नाही. त्यामुळे आपण सांगितलेल्या तऱ्हेचे गहू मी आणू शकले नाही.' बुध्ददेव म्हणाले, 'माई ! अग प्रत्येक प्राणीमात्राच्या नशीबी जर आज ना उद्या मरण अटळ आहे, तर तुझ्या बाळाला उद्याऎवजी आज मृत्यू आला, म्हणून असं दु:ख करीत बसणं योग्य आहे का ? तेव्हा त्या मृत मुलाचा मोह सोडून, तू दु:ख आवर आणि मनुष्य म्हणून आपल्यावर पडणारी कर्तव्ये पार पाडण्यात रमून जा.' भगवान बुध्ददेवांच्या या चातुर्यपूर्ण उपदेशानं ती दु:खी माता बरीच शांत झाली आणि आपल्या बाळाचं शव घेऊन तिथून निघून गेली.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂.
श्री . देशमुख. एस. बी,
🌻सचिव🌻
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ
📱7972808064📱
🙏🌹 सेक्रेटरी -बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर 🌹🙏मुख्याध्यापक पाताळेश्वर विद्यालय पाडळी🌹 सचिव , प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे .
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸