*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी मो .९०१११८१७१८*
*दिनांक :~ 23 डिसेंबर 2022*
*वार ~ शुक्रवार*
*आजचे पंचाग*
*मार्गशीर्ष. 23 डिसेंबर*
*तिथी : कृ. अमावस्या (शुक्र)* *नक्षत्र : मूळ,*
*योग :- गंड*
*करण : किंस्तुघ्न*
*सूर्योदय : 07:00, सूर्यास्त : 05:50,*
*सुविचार*
*लाचारी स्विकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानाने स्विकारलेला एकटेपणा कधीही चागंला*
*म्हणी व अर्थ*
*गोरा गोमटा आणि कपाळ करंटा.*
*अर्थ:- फक्त दिखावट चांगली आणि प्रत्यक्षात काहीच नसणे.*
*दिनविशेष*
*शेतकरी दिन*
*या वर्षातील 357 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना*
*१९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो इजिप्त येथे आगमन.*
*१९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.*
*२०००: कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी*
*२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.*
*२०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.*
*जन्मदिवस / जयंती*
*१९०२ : चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १९८७)*
*१८९७ : कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार*
*१८५४ : हेन्री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ एप्रिल १९२६)*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*२०१० : के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक (जन्म: ५जुलै १९१६)*
*२०१० : ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ’पाऊस’, ’भरती’, ’चिद्घोष’,हे कथासंग्रह, ’दोन बहिणी’, ’ ’कोंडी’ या कादंबर्या व ’पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २१ मे १९२८)*
*२००८ : गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (जन्म: ३१ जानेवारी १९३१)*
*२००४ : नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (जन्म: २८ जून १९२१)*
*२००० : ’मलिका-ए-तरन्नुम’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ – कसुर, पंजाब, भारत)*
*१९६५ : गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (जन्म: २ जुलै १८८०)*
*१९२६ : स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल* *विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)*
*सामान्य ज्ञान*
*भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?*
*बोधगया*
*गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?*
*न्यूटन*
*पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?*
*लाला लजपतराय*
*महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?*
*2 ऑक्टोबर 1869*
*पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?*
*5 वर्षा पर्यंत*
*बोधकथा*
*धनाचा विनियोग*
एकदा एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता.
कोल्ह्याने नागाला विचारले,”हे नागदेवता, तुम्ही इथे काय करता आहात.” नाग म्हणाला,” माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.” मग कोल्हा पुन्हा म्हणाला,” पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही.
उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय” नाग म्हणाला,” कसं शक्य आहे, हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.”हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला,” मग नागदेवा, तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग”
*तात्पर्य – ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्यमात्राला काहीच फायदा नाही.*
*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*
*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,**सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*
*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी मो .९०१११८१७१८*