*परीपाठ/पंचाग/दिनविशेष* 

0
सौ. सविता देशमुख, उपशिक्षिका *7972808064*

*दिनांक :~ 04 जाने 2023  , वार ~ बुधवार *

*आजचे पंचाग* 

*पौष. 04 जानेवारी*

*तिथी : शु. त्रयोदशी (बुध)*   

*नक्षत्र : रोहिणी,*

*योग :- शुक्ल*

*करण : कौलव*

*सूर्योदय : 06:57, सूर्यास्त : 05:52,*

* सुविचार* 

*परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.*

*म्हणी व अर्थ* 

_आवळा देऊन कोहळा काढणे._ 

_अर्थ :- अल्प आमिष दाखवून मोठे मोठे काम करून घेणे._

*दिनविशेष*     

*या वर्षातील 04 था दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना* 

_१८८१: लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली._

_१९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली._

_१९३२: जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना इस्ट इंडिया कंपनी चे तेव्हाचे व्हाईस रॉय विलिंगडन यांनी अटक केली._

_१९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला._

_१९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला._१९५८: १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले._

_१९९०: पाकिस्तान मध्ये दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या मुळे ४०० लोक मारल्या गेले आणि ५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले._

_२००४: नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली._

_२०१०: ’बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले._

*जन्मदिवस / जयंती*

_१६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म._

_१८०९: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२)_

_१८९२: ला भारतीय अर्थशास्त्रज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचा जन्म._

_१९१४: इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २०००)_

_१९४१: कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ – नवी दिल्ली)_

_१९६५: भारतीय चित्रपट अभिनेते आदित्य पंचोली यांचा जन्म._

मृत्यू / पुण्यतिथी

_१८५१: दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन._

_१९०७: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० आक्टोबर १८५५ – नडियाद, गुजराथ)_

_१९०८: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ – कशेळी, राजापूर, रत्‍नागिरी)_

_१९६१: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)_

_१९६५: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)_

_१९९४: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म: २७ जून १९३९)_

*सामान्य ज्ञान* 

*कर्नाटक या राज्याची राज्यभाषा कोणती आहे?* 

*कन्नड*

 अन्न चावताना त्यात कोणता पाचक रस मिसळतो?* 

 लाळ

*शांती निकेतन ही निसर्गाच्या सान्निध्यात रमणारी शैक्षणिक संस्था कोणी स्थापन केली?* 

*रविंद्रनाथ टागोर*

*पदावर असताना निधन पावलेले भारताचे पाहिले राष्ट्रपती कोण आहेत?* 

*डॉ.झाकीर हुसेन*

*लोणार सरोवर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?* 

*महाराष्ट्र* ————————————————————

*बोधकथा* 

*अपमान आणि उपकार*

    एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो, “आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले”. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो, “आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले”. हे पण  थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,”पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?” लिहिणारा मित्र म्हणाला, “जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत._

 *तात्पर्य* :- 

*”माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे”.*

 

*श्री. देशमुख. एस. बी,* *सचिव**नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ**7972808064*

*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,**सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*

_सौ . सविता देशमुख     =  उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी_ 7972808064

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here