*❂ दिनांक :~ 18 जाने 2023 ❂**वार ~ बुधवार*
*आजचे पंचाग*
*पौष. 18 जानेवारी*
*तिथी : कृ. एकादशी (बुध)*
*नक्षत्र : अनुराधा,*
*योग :- वृध्दी*
*करण : कौलव*
*सूर्योदय : 06:55, सूर्यास्त : 05:55,*
*सुविचार*
*खरे सौंदर्य हे हृदय आणि गुणांमध्ये असते. पण लोक ते नाहक रूप आणि कपड्यांमध्ये शोधत असतात.*
*म्हणी व अर्थ*
*घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.*
*अर्थ :- एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग.*
*दिनविशेष*
*या वर्षातील 18 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना*
*१७७८: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.*
*१९११: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.*
*१९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.*
*१९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.*
*१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.*
*२००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.*
*जन्मदिवस / जयंती*
*१८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)*
*१८५४: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.*
*१८८९: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)*
*१९७२: भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा जन्म.*
*१९९५: साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१९३६: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८६५)*
*१९४७: भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०४)*
*१९६७: कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.*
*१९७१: भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.*
*१९९३: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०५)*
*१९९६: अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२३)*
*२००३: हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)*
*सामान्य ज्ञान*
*सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?*
*बुध*
*WHO ची स्थापना कोण्या वर्षी करण्यात आली?*
*१९९५*
*देशाचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते?*
*महात्मा गांधी*
*पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?*
*विषवृत्त*
*विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?*
*चिखलदरा*
*बोधकथा*
*सवयी सुटू शकत नाही!*
*कृष्णेला पूर आला होता. यंदाच्या पावसाळतील हा पहिलाच पूर. पुराचे पाणी पाहण्यासाठी दोन्ही काठांवर गर्दी ओसंडून वाहत होती. त्या गर्दीत पांडुरंगही होता. इतक्यात तेथे असलेला सहदेव ओरडला, ‘अरे पांडुरंग, घोंगडं वाहत चाललं आहे. पाहिलसं का?’ लोभी वृत्तीच पांडुरंगची लालसा चाळवली गेली. त्याने मागचा पुढचा विचार न करता नदीत उडी घेतली. घोंगडेही खूप लांब नव्हते. सात-आठ हात मारून पांडुरंग घोंगडय़ाजवळ गेला. त्याने घोंगडे पकडले. मग मात्र तोच ओरडू लागला, ‘वाचवा! वाचवा!’ तेव्हा काठावर असणारे, त्याला व त्याच्या लोभी वृत्तीला ओळखणारे लोक म्हणाले, ‘अरे, यात ओरडण्यासारखं काय आहे? जर तू ते घोंगडं बाहेर आणू शकत नसशील तर सोडून दे!’ तेव्हा पांडुरंग म्हणाला, ‘अहो, हे घोंगडं नाही, अस्वल आहे. आणि त्यानेच मला पकडलं आहे. कसं सोडू?’*
*तात्पर्य – आपण सवयींना असेच अगोदर पकडतो, आणि मग सवयी आपणाला पकडतात. मग सुटू शकत नाही.*
*एस बी देशमुख, मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*
*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.* सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी सिन्नर_*7972808064*