सौ सविता देशमुख, उपशिक्षिका- पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता- सिन्नर नाशिक
📱9970860087📱
_*❂ 📆दिनांक :~ 31 जुलै 2023 ❂*_
❂🎴 वार ~ सोमवार 🎴❂
_*🏮 आजचे पंचाग 🏮*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण. ३१ जुलै
तिथी : शु. चतुर्दशी (सोम)
नक्षत्र : पुर्वाशाढा,
योग :- विष्कंभ
करण : गर
सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 06:057,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
🧠ज्या क्षणी तुम्हाला जाणिव होते की…आपला प्रवास एकट्याला करायचा आहे,
तो क्षण तुमचे आयुष्य बदलवून टाकणारा असतो…!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜
📌गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
🔍अर्थ:-
एखादे काम सिद्धीस गेले तर ठीक नाही तर नुकसान नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆
🌞या वर्षातील🌞 212 वा दिवस आहे.
_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_
👉”१४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.
👉१९४८: भारतात कलकत्ता शहरात प्रथम राज्य सेवा परिवहनाची स्थापना करण्यात आली.
👉१९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने १९ बळी घेतले.
👉१९९२: भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
👉२०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे (CAT) डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार जाहीर
👉२०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोड
_*💐जन्मदिवस / जयंती💐*_
👉”१८८०: धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. (मृत्यू: ८ आक्टोबर १९३६)
👉१९०२: केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)
👉१९१२: मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
👉१९४१: अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
👉१९४७: मुमताज – अभिनेत्री
👉१९६५: जे. के. रोलिंग – हॅरी पॉटर मुळे प्रसिद्ध झालेल्या इंग्लिश लेखिका
_*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_
👉”१८६५: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ, आधुनिक मुंबईचे शिल्पकार (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
👉१९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
👉१९६८: शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
👉१९८०: मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (जन्म: २४ डिसेंबर १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब)
👉२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २३ जून १९४८)”
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
👉भारतातील क्षेत्र फळाने सर्वात लहान असणारे राज्य कोणते आहे?
🥇गोवा
👉सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली?
🥇रमाबाई रानडे
👉 दळणवळनाच्या मार्गाचे मुख्य प्रकार किती व कोणते?
🥇तीन प्रकार, जमिनीवरील, पाण्यावरील, हवेतून
👉भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे?
🥇कमळ
👉जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते?
🥇जंगल तोड
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻
🕊️कबूतर आणि शिकारी💂♀️
एका जंगलामध्ये खूप सारे कबूतर एकत्र राहात होते. एका शिकाऱ्यांना या जंगलामध्ये राहणाऱ्या कबुतरांची चाहूल झाली व त्याने या कबुतराला पकडण्यासाठी एक युक्ती केली. शिकारी आणि कबूतर राहणाऱ्या आसपासच्या जागेमध्ये जाळी घातले व त्या जाळांमध्ये डाळींबाचे बीअंथरले.
तेथे एक कबुतरांचा थवा आला व त्या थव्यातील कबूतरांनी केवळ डाळिंबी चे बी पाहिले व ते बी खाण्यासाठी कबुतरखाने जाळ्यावर झेप घेता सर्व कबूतर जाळ्यामध्ये अडकले.
तेव्हा सर्व कबुतरांच्या लक्षात आले की आपण एखाद्या शिकाऱ्याच्या कावडी मध्ये सापडला त्या आजारातून सुटका करण्यासाठी एक एक कबूतर बळ मिळवून देण्याचा प्रयत्न करू लागली पण एकाही कबुतराला जाळ्यातून सुटका करता आली नाही. सर्व कबूतर हा तास झाले व त्यांना वाटले की आता आपण शिकार होणार तेवढा कबुतराच्या थव्यातील एक म्हातारी कबूतर पुढे आले व सर्व कबुतरांना सांगत ते म्हणाले, ” एकट्याच्या बलाने हे जाळ उडणे अतिशय कठीण आहे परंतु सर्व कबुतराने एकसाथ मिळून ताकद लावली तर आपण हे सर्व जाळे घेऊन पडू शकतो.”
म्हाताऱ्या कबुतरा चे बोलणे सर्व कबुतरांचा लक्षात आले व सर्वांनी एक साथ मिळून ताकत लावताच जाळे उडाले व सर्व कबूतर जाळ्यात सोबत पळून गेले अशा प्रकारे सर्व कबुतरांची शिकाऱ्याच्या हातातून सुटका झाली.
🧠तात्पर्य: एकीचे बळ नेहमी मोठे असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी, ता. सिन्नर. जि . नाशिक
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा शिक्षण संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸