सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी येथे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अण्णासाहेब शिंदे यांचे स्नेही उल्काताई शिंदे तसेच माजी उपसरपंच भगीरथ रेवगडे ग्रामपंचायत सदस्य धनंजय रेवगडे तसेच पोलीस अधिकारी गणेश रेवगडे उपस्थित होते. या प्रसंगी दर्शन वारुंगसे, शाम रेवगडे, पायल शिंदे यांनी भाषणे, पोवाडे सादर केली. यावेळी श्रीमती एम. एम. शेख यांनी राजमाता जिजाऊ बद्दल माहिती सांगितली. तर स्वामी विवेकानंद यांच्यावर श्रीमती सी.बी. शिंदे यांनी माहिती सांगितली. तसेच कोटकर एस. एम. यांनी अण्णासाहेब शिंदे यांच्या विषयी माहिती सांगितली. याप्रसंगी धनंजय रेवगडे यांनी अण्णासाहेब शिंदे यांनी हरित व धवल क्रांती केली. पंजाब मध्ये लोक त्यांना देवासमान मानतात असे सांगितले. तर गणेश रेवगडे यांनी विद्यार्थ्यांनी यू पी एस सी व एम पी एस सी परीक्षेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व अधिकारी व्हावे असे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी. देशमुख सर होते. या प्रसंगी आपण ही जिजाऊ व शिवबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तम कार्य केले पाहिजे, उत्तम नागरिक बनले पाहिजे आजचा दिवस हा स्वामी विवेकानंद जयंती निमित्त देशभरात युवक दिन साजरा केला जात आहे यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी स्वामी विवेकानंदाचे गुण आत्मसात करावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती शिंदे सी.बी. यांनी केले. याप्रसंगी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी.के रेवगडे,विद्यालयातील शिक्षक बी. आर.चव्हाण, आर. व्ही.निकम, आर. टी.गिरी, एम.सी.शिंगोटे, सौ.सविता देशमुख, के.डी. गांगुर्डे,आर. एस.ढोली, थोरे ए. बी उपस्थित होते.