सिन्नर : पाताळेश्वर विद्यालयातील लव व अंकुश बोगीर या दोन जुळ्या भावांनी अथक परिश्रम घेत पोलिस भरतीत घवघवीत यश मिळवून त्यांची निवड झाली.यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.लव व अंकुश यांच्या कुटुंबाची परिस्थिती तशी अत्यंत बिकट परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दोन्ही भावडांनी सोबत आपले माध्यमिक शिक्षण पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात घेऊन पुढे बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण करत असतांना स्पर्धा परीक्षाची तयारी करत आपले पोलिस भरतीचे स्वप्न साकार करून नुकतीच त्यांची महाराष्ट्र पोलिस दलात मीरा भायंदर येथे निवड झाली.
अत्यंत अबोल व अभ्यासात हुशार असणारे हे जुळे भाऊ सोबतच आपले त्यांनी ध्येय साकार केले. १०वीत सारखे गुण १२वीत सारखे गुण पोलीस भरतीतही सारखे गुण दिसायला सारखे उंची तब्येत सारखी गणवेश घातला की कोण लव आणि कोण अंकुश ओळखणे कठीण . वडील शेती व्यवसाय करत असून त्यांचे कुटुंब अध्यात्मिक व सोज्वळ आहे.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी या माजी जुळ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशीच सोबत प्रगती करून उंच शिखर गाठा व आपल्या गावाचे व शाळेचे नाव उज्वल करा असे सांगितले.परिसरातील इतर* *युवकांनीही त्यांचा आदर्श घेऊन शासकीय सेवेत उच्च अधिकारी व्हावे असे सांगितले.
या जुळ्या भावडांचा येथोचीत सत्कार सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.अशोकराव भवारी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मा. विजय कुटे साहेब तालुका व्यवस्थापक उमेद, शालेय समिती चेअरमन चंद्रभान रेवगडे ,धनंजय रेवगडे,भगीरथ रेवगडे,केशव सहाणे,ग्रामसेवक विलास शिंदे,बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे शिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर,आर.टी. गिरी,एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे, आर.एस.ढोली,ए.बी. थोरे उपस्थित होते.