विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी
नांदेड – प्रतिनिधी
विद्यापीठातील अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबत प्राधिकरण बैठकीत विविध प्रस्ताव व प्रश्न विचारून त्यावर कारवाई करावी यासाठी सिनेट सदस्य डॉ. महेश मगर यांच्याकडून विद्यापीठ प्रशासनास विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात ई मेल व्दारे निवेदन देण्यात आले होते परंतु विद्यापीठाच्या प्रशासनाकडून काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही व प्राधिकरण बैठकीत झालेल्या ठराव आणि निर्णयावर कार्यवाही विहित कालावधीत करण्यात आली नाही. तसेच नियमबाह्य कामे करण्यात येत होती त्याची चौकशी करण्यासाठी पत्र दिले होते. परंतु सदर पत्रावरही कारवाई करण्यात आली नाही आणि विविध मागण्या बाबत विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी आज बुधवार दि.१२ मार्च रोजी सकाळी १0 वाजता स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा सिनेट सदस्य डॉ. महेश मगर यांनी केली आहे
त्यांनी विद्यापीठ प्रशासनास केलेल्या मागण्यांत पेट – २०२४ परीक्षेचे दोन्ही पेपरचे मूल्यांकन व गुण एकत्रित करून युजिसी नियमानुसार निकाल जाहीर करावा फेलोशिपधारक संशोधक विद्यापीठाबाहेरील दुसऱ्या विद्यापीठातील तज्ञ बोलावले आहेत येतो त्याचा प्रवास खर्च व भत्ता देण्यात यावा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगरच्या धरतीवर पीएचडीच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती त्या धरतीवर लागू करण्यात यावी.व फेलोशिप धारक संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी फेलोशिप रिसर्च कमिटी तात्काळ स्थापन करण्यात यावी तसेच विद्यापीठ परिसरातील संशोधन केंद्रातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संकुलामध्ये अभ्यास करण्यासाठी संशोधन करण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत आणि विद्यार्थिनींसाठी दत्तक योजनाही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावी व विद्यार्थिनीच्या वस्तीगृहामधील स्वच्छतागृह व दैनंदिन वापरासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात यावी त्याचबरोबर विद्यार्थिनींच्या वस्तीगृहामध्ये भेटीसाठी येणाऱ्या पालकांसाठी व्हिजिटिंग रूम कार्यान्वित करण्यात यावी यासह विद्यापीठाच्या उपहारगृहे व भोजनालयांमध्ये मंजूर दरांची यादी चे फलक दर्शनीय भागात लावण्यात यावे तसेच अधिसभा बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या हिताच्या झालेल्या ठराव व निर्णयांवर विना विलंब कारवाई करण्यात यावी. असे न करणाऱ्यां संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. अशा विविध मागण्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व प्रशासनाचे कान उघडे व्हावे यासाठी घंटानाद आंदोलन करीत आहे असे डॉ. महेश मगर यांनी सांगितले आहे .