अनिल वीर कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळात राज्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये राज्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त -विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकांचे सामुहिक वाचनानंतर वृक्षारोपणचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रा.डॉ. पी. डी. पाटील यांच्या कथाकथनाचे आयोजन करण्यात आले होते.
विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी. एम. किल्लेदार, सहाय्यक सचिव हावळ एस.एल. व मंडळातील कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये क्रिकेट, बुध्दिबळ, कॅरम, संगीत खुर्ची, हॉलीबॉल, लिंबू चमचा, बॅडमिटन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एस.एम. लोहिया प्रशालेत यांच्या गडकरी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस नकला असे विविध कर्मचाऱ्यांच्या गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले. शिक्षकमंचाच्या कलाकारांनी सुमधुर गायनही केले. मंडळ कार्यालयामध्ये महालक्ष्मी रक्तकेंद्र मंगळवार पेठ कोल्हापूर यांच्यामार्फत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेवून १६ जणांनी रक्तदान केले.