ग्रामीण युवक युवतींचे नोकरदार होण्याचे स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनी आघाडीवर
कोपरगाव प्रतिनिधी : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये आपल्या पाल्याला दाखल केले की त्याचे किंवा तिचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण होणारच, हा विश्वास पालकांमध्ये आहे. या विश्वासाला अधीनराहुन महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागासह इतर अभियांत्रिकीचे सर्व विभाग आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देत असतात. या सामुहिक प्रयत्नांमधुन अलिकडेच इंडोव्हन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नोकरीसाठी नऊ नवोदित अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच नोकरीसाठी निवड केली आहे, अशा प्रकारे गामीण विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न संजीवनी मार्फत पुर्ण होत असल्याची माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
इंडोव्हन्स प्रा. लि. ही कंपनी २००३ पासुन जगभरातील अग्रगण्य यांत्रिकी अभियांत्रिकी कंपन्यांना कॅड सोल्युशन्स प्रदान करीत आहे. या कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अभय बाबासाहेब चितळे, प्रथमेश राजेंद्र बडगुजर, मुस्कान ताजमोहम्मद पठाण, कार्तिक राजेद्र पवार, अमरीन मंजुराअहमद शेख, म्रिदुलक्रिष्णा मनोज कोणनगठ, सिव्हिल इंजिनिअरींगच्या अभिजीत अनिल दळे, वेदांत चंद्रकांत राऊत स्ट्रक्चरल इंजिनिअरींगच्या अमेय संदीप नाईक यांची नोकरीसाठी निवड केली आहे.
प्रत्येक अभियांत्रिकी विभाग कंपनी निहाय काय आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना दिले पाहीजे, याचा अभ्यास सतत करीत असतो. टी अँड पी विभागा मार्फत मुलाखतीचे तंत्र, संभाषण कौशल्य, केश व वेशभूषा , देहबोली, हजरजबाबीपणा, आदरयुक्तपणा, अशा अनेक बाबींचेप्रशिक्षण दिल्या जाते. प्रत्येक विभागाची मेहनत आणि त्या जोडीला टी अँड पी विभागाचे प्रयत्नांनी दरवर्षी शेकडो नवोदित अभियंते कमावते होवुन आई वडीलांनी डोळ्यात साठविलेले स्वप्ने पुर्ण करत आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले अभियंते व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डायरेक्टर डॉ. ए.जी.ठाकुर, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. प्रसाद पटारे, सिव्हिल व स्ट्रक्चरल इंजिनिअरींगचे विभाग प्रमुख डॉ. अत्तेशामुद्दीन सय्यद, डीन टी अँड पी डॉ. विशाल तिडके व प्रा. अतुल मोकळ योचेही अभिनंदन केले आहे.े.