समकालीन प्रकाशन संस्था पुणे यांच्याकडून पाताळेश्वर विद्यालयास  पुस्तके भेट_

0

_सिन्नर :जागर समकालीन वाचनाचा या चळवळीअंतर्गत पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयास  पुस्तके भेट देऊ केली.* *विद्यार्थ्यांच्या शालेय ज्ञानाबरोबर अवांतर ज्ञानात भर पडावी या हेतूने डॉ. जयदीप दाते यांनी आपल्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पुस्तके भेट दिली विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी व त्यांच्या मनात वाचनाविषयी भावना निर्माण होण्याच्या उदात्त हेतूने ही भेट दिली.

विद्यालयास या पुस्तकांचे वाचनालयाकडे सुपूर्त करण्यासाठी समाजसेविका सौ सुनिता मुरकुटे व सौ मनिषा सांगळे यांना पाचारण केले सौ सुनिता मुरकुटे यांनी बालमनाची जडणघडण होण्या कामी पुस्तकांचा वाटा मोठा असल्याचे  सांगितले. वाचनातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात व विचारशक्ती प्रगल्भ होते बालमनावर संस्कार घडविण्याचे काम अध्यात्मातून केले जाते आपल्या जीवनात आपण थोर व्यक्तींचा आदर्श बाळगून आपले चारित्र्य आपण घडविले पाहिजे. संस्काराची शिदोरी आपल्यासोबत नेहमी बाळगा,आरोग्यासाठी आहार व व्यायामाची गरज असते. आजची पिढी ही वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे संस्काराचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसतो म्हणून आपल्या जीवनात संस्काराची गरज असल्याचे सांगितलबाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी देशमुख यांनी पुस्तके ही  आपल्या जीवनात मार्गदर्शनाचे काम करतात व योग्य मार्गदर्शनाने मानवी जीवन समृद्ध व विकसित होते आपल्या जीवनात संस्काराची रुजवन करा म्हणजे आपले जीवन आदर्शवत  होऊन आपण आदर्श नागरिक बनवू या असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सौ. सविता देशमुख यांनी केले यावेळी त्यांनी आपल्या वाचनालयात देणगी स्वरूपात मोठया प्रमाणात पुस्तके मिळालेली आहे .विद्यार्थी वाचनासाठी त्याचा पुरेपूर वापर करतात यात संस्थेचा मोठा वाटा आहे .आभार श्रीम . सी .बी .शिंदे यांनी मानले कार्यक्रमासाठी बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक श्री रेवगडे टि .के. तसेच बी. आर. चव्हाण, आर .व्ही. निकम, एस. एम .कोटकर, आर .टी. गिरी, एम .सी. शिंगोटे, एम .एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के.डी. गांगुर्डे, एस.डी. पाटोळे, आर .एस .ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here