नाशिक : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाने वरील सर्व उपक्रम सुविधा अगदी चांगल्या पद्धतीने अद्यावत करून चांगले व्यवस्थापन केलेले आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांनी या विद्यालयाचा आदर्श घेऊन प्रयत्न करावे अशिमा मित्तल मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO)नाशिक यांनी सांगितले. मित्तल पुढे म्हणाल्या की नाशिक जिल्ह्यातील शाळा या स्वच्छ शाळा सुंदर शाळा होण्यासाठी मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रयत्न केले पाहिजे. शाळेत घनकचरा व्यवस्थापन,परसबाग, डिस्पोजल सॅनेटरीन नॅपकिन मशीन, शाळा इमारत परिसर स्वच्छता, पाणी शुध्दीकरण, पावसाचे पाणी पुर्नभरणसुविधा, हॅण्ड वॉश, कोविड १९ बाबतच्या सर्व सुविधा, सुका कचरा ,ओला कचरा, दिव्यांगासठी खास भौतिक सुविधा, मुलां मुलींसाठी स्वतंत्र भौतिक सुविधा, वृक्ष लागवड व संवर्धन, बीजांकुरण उपक्रम, तंबाखू मुक्त शाळा उपक्रम, विद्यार्थी पालक शिक्षक समिती, ग्रामपंचायत सहभाग, विद्यार्थी आरोग्य, स्वच्छतेबाबत घेतलेल्या स्पर्धा, जनजागृती मोहीम राबविणे.
तसेच विद्यार्थी विज्ञान निष्ठ होण्या करता विविध उपक्रम राबविले जातात विज्ञान व स्वच्छतेची सांगड घालून दैनंदिन जीवन कसे जगावे यासाठी सुद्धा विद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात.शिस्त,स्वच्छता,वैज्ञानिक दृष्टीकोन राष्ट्रभक्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी विविध मार्गदर्शन केले जाते.त्यातून विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्ती वाढण्यास मदत होते.मध्यान्ह पूर्वी व नंतर विद्यार्थी हात स्वच्छ धुणे.विद्यार्थी वक्तशीर बनावा याकरिता विद्यालयात प्रयत्न केले जातात.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी नाशिक अशिम मित्तल,गटशिक्षणाधिकारी पं.स.सिन्नर च्या मंजुषा सांळुके,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख,मयूर आव्हाड हे उपस्थित होते .