अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये बालदिनानिमीत्त आनंद मेळावा उत्साहात साजरा

0

संगमनेर : अमृतवाहिनी मॉडेलस्कूलमध्ये १४ नोव्हेंबर ( बालदिनाचे ) औचित्य साधून बालकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्व समजून त्यांच्यात जीवन कौशल्यांचा विकास व्हावा हा यामागील प्रमुख हेतू होता.
      सदर बाल मेळाव्याचे उद्घाटन विश्‍वस्त सौ.शरयुताई देशमुख,प्राचार्या सौ.जसविंदरकौर सेठी यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ.डंग,सौ.रनाळकर ,सौ.हजारे,उदय कर्पे,श्रीमती रहाणे  यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी  विविध स्टॉल उभारले होते.
        यावेळी सौ.शरयुताई देशमुख म्हणाल्या कि, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्था गुणवत्तेत अव्वल ठरली आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी येथे विविध सहशालेय उपक्रमांचे सातत्याने आयोजन होत असते. असे उपक्रम विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी व जीवन कौशल्यांचा विकास होण्यासाठी महत्वाचे आहेत. आजचा बालदिनामित्तचा आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरली असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
         या उपक्रमाबाबत अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, संचालिका सौ. शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अनिल शिंदे, मॅनेंजर व्ही.बी. धुमाळ तसेच स्कूलच्या प्राचार्या सौ.जे.बी.सेटी यांनी विशेष अभिनंदन करुन विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here