आर जे एस  नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक स्तन कॅन्सर रोग दिन साजरा.

0

कोपरगाव प्रतिनिधी

________________

कोपरगाव :-  जागतिक स्तन कर्करोग जागरुकता महिना हा दरवर्षी ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या महिन्यान महिनाभर साजरा केला जातो. याचेच औचित्य साधत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील नामवंत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजमार्फत १८ ऑक्टोबर रोजी संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल मध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमातंर्गत नर्सिंगच्या विदयार्थ्यांनी एक नाटिका सादर करून जनजागृती केली. तसेच स्तन कर्करोगाशी निगडीत सर्व माहिती रूग्णांना व  नातेवाईकांना देण्यात आली.

कार्यक्रमात संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बागडे, डॉ.उबाळे,सचिन जानवकर, सर्व परिचारिका,अधिक्षक मर्सी मॅडम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली डॉ.बागडे सर यांनी रुग्णास स्तन कर्करोगाशी  निगडीत सर्व माहिती देऊन समुपदेशन केले. कार्यक्रमास नर्सिंग कॉलेजचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी, रुग्ण ,नातेवाईक यांनी उपस्थिती लावली, 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here