आळंदीत आणि पंढरीत गुहा गावातील घटनेच्या निषेधार्थ लाखोंचा निषेध मोर्चा काढू :उद्धव महाराज मंडलिक

0

    देवळाली प्रवरा  प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील गुहा गावातील भजनी, पुजारी, वारकरी हे एकटे नसून राज्यातील वारकरी त्यांच्या पाठीशी आहेत.आळंदीत आणि पंढरीत गुहा गावातील घटनेच्या निषेधार्थ लाखोंचा निषेध मोर्चा काढू, असे प्रतिपादन उद्धव महाराज मंडलिक यांनी राहुरी येथे आयोजित वारकरी व गुहा पंचक्रोशीतील नागरीकांनी काढलेल्या मोर्चाप्रसंगी केले. तर आता खूप झाले, आपल्या धर्मस्थळाकडे वाकडे पाहणाऱ्यांना यापुढे जागेवरच उत्तर द्या, आपण आता रडायचे नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे आपण वारस आहोत.यापुढे जर गुहा गावातील पुजारी, वारकरी यांच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहीले, त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आख्ख्या राहुरी तालुक्यातील हिंदू लोकांनी एकत्र यावे आणि या अपप्रवृत्तींना ठेचून त्यांचा जागेवर बिमोड करावा,असे खुले आवाहन पांडुरंगगिरी महाराज यांनी यावेळी केले.

हिंदूरक्षक संत परिषदेच्यावतीने आज राहुरीत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ दैनंदिन पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांवर व भजन करणाऱ्या वारकऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ काल मंगळवारी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो वारकरी व गुहा व पंचक्रोशीतील कानिफनाथ भक्त या मोर्चात सहभागी झाले होते. टाळ मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथ भक्त वायएमसी ग्राउंडवर एकत्रित झाले त्यानंतर अतिशय शिस्तबद्ध रित्या निघालेला मोर्चा नगर-मनमाड मार्ग, शहरातील मुख्य पेठ मार्गे राहुरी तहसीलवर धडकला. यावेळी रामकृष्ण हरी, कानिफनाथ महाराज की जय आदी जयघोष करण्यात आला. या मोर्चात महंत उद्धव महाराज मंडलीक, पांडुरंग महाराज वावीकर, अर्जुन महाराज तनपुरे, आदिनाथ महाराज दुशिंग, किशोर महाराज जाधव, संजय महाराज शेटे, भगवान महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, श्रीकांत महाराज गागरे, नवनाथ महाराज आहेर, सुजित महाराज कदम, प्रमिला महाराज कोळसे आदींसह राज्यातील संत महंत व टाकळरी, वारकरी व नाथ भक्त सहभागी झाले होते. यावेळी उद्धव महाराज मंडलीक, पांडुरंग महाराज वावीकर, किशोर महाराज जाधव, अजय मांजरे, संपत महाराज जाधव, प्रा.एफ. झेड देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. वारकरी व नाथभक्त यांच्या मोर्चास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वारकरी, नाथभक्त व गुहा ग्रामस्थ यांनी वारकऱ्यांवर व पूजाऱ्यांवर हल्ला करण्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलिस प्रशासनाने स्वीकारले. शेवटी पसायदानाने या मोर्चाची सांगता झाली.

त्यांना’ वाळीत टाका

गुहा गावातील ज्या लोकांनी वारकरी, पुजाऱ्यांना मारहाण केली त्या कुटूंबावर बहीष्कार टाका, कोणीही त्यांच्याबरोबर कसलाही व्यवहार करायचा नाही, त्यांच्याकडून काही घ्यायचे नाही. आपल्या दुकानात ते काही घ्यायला आले तर १० रूपयांची वस्तू १००० रूपयांना मागितली तरी ती द्यायची नाही. या लोकांना वाळीत टाका, खड्यासारखे दूर फेका, असे आवाहन यावेळी पांडुरंगगिरी महाराज यांनी केले.

अपप्रवृत्ती जागेवरच गाडा; ह.भ.प.मंडलिक 

        वारकरी संप्रदायाने नेहमी सहिष्णुता शिकवलेली आहे. परंतु, आता एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस नसून तेथेच हात धरून समोरच्याला शिक्षा दिली पाहीजे. धर्म, संस्कृतीचे, आपल्या देवदेवतांचे मंदिरांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य नव्हेतर धर्मपण आहे. त्यामुळे जर आपण त्याचे रक्ष करू शकत नसलो आणि आपला अति मानवतावाद व उदारतावाद या प्रवृत्तींना समजत नसेल तर अशांना त्याच ठिकाणी दंड देणे हेही नितीचेच एक काम असल्याचे उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

             

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here