औरंगाबाद येथे होणाऱ्या धनगर आक्रोश मेळाव्याला उपस्थित राहण्याचे खासदार महात्मे यांचे आवाहन .

0

पैठण दि .३१ राज्यात  धनगर समाजाची लोकसंख्या तीन कोटीच्या वरती आहे  बहुसंख्य समाज असतानाही विखुरल्यामुळे शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे . धनगर समाजाची आजपर्यंत प्रत्येक राजकीय पक्षां सह सरकारकडून फसवणूकच होत आली आहे .धनगर समाजाला एसटी आरक्षणासह  इतर प्रलंबित मागण्याच्या अंमलबजावणीसाठी धनगर आक्रोश मेळावा औरंगाबाद येथे दि .६ रविवार  रोजी सकाळी अकरा वाजता हर्सुल येथे आयोजित केला असून या आक्रोश मळाव्याला तालुक्यातील  धनगर समाजाने मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन शनिवार रोजी राज्यसभेचे खासदार डॉ . विकास महात्मे यांनी पैठण येथे केले .

शनिवार रोजी खासदार डॉ . विकास महात्मे हे पैठण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते . पैठण तालुक्यातील धनगर  समाजाने मोठ्या संख्येने  आक्रोश मेळाव्यात सहभागी व्हावे यासाठी त्यांनी पैठण तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या .यावेळी बोलताना ते म्हणाले की धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी .जे आदिवासींना तेच धनगरांना या बावीस योजना तिन हजार कोटीची तात्काळ अंमलबजावणी करावी .वन विभागाचे मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी क्षेत्र मोकळे करावे . यासह इतर अनेक प्रलंबित मागण्या धनगर समाजाच्या आहेत यासाठी राज्यातील धनगर समाज दि६ रविवार रोजी अकरा वाजता हर्सुल हरसिद्धी माता मंदिर औरंगाबाद येथे आक्रोश मेळाव्याला उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे .राज्याचे रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांचीआक्रोश मेळाव्याच्या अनुषंगाने खासदार महात्मे यांनी भेट घेतली . यावेळी    माजी सभापती अरुण रोडगे , ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब गलांडे,धनगर समाज संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष विकास   नाचन, माजी सरपंच बाळासाहेब गाढे,योगेश पाचे, बंडू डोईफोडे, माजी पंचायत समिती सदस्य बालाजी नलभे चेअरमन तथा उपसरपंच राजेंद्र वाघमोडे सह आदी  यावेळी उपस्थित होते .पैठण तालुक्यातील धनगर समाज मोठ्या प्रमाणावर या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे यावेळी दादासाहेब गलांडे म्हणाले .

फोटो .

पैठण  धनगर आक्रोश मेळाव्यालाउपस्थित राहण्याचे आवाहन खासदार विकास महात्मे करताना सोबत दादासाहेब गलांडे, अरुण भाऊ रोडगे, विकास नाचन .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here