सातारा : गेल्या अनेक महिन्यांच्या मंदीनंतर आता राज्यातील कांदा बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे मान्सूनच्या अगदी सुरुवातीला शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत. खरे तर मान्सूनची नुकतीच दणक्यात सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे खानदेशातील काही भाग वगळता आणि विदर्भातील काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री झाली आहे.
मान्सून आगमन झाल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरु झाला आहे. काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला आहे, यामुळे पेरणीच्या कामाला आत्ता मोठी गती मिळाली आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच ही बातमी सुखद धक्का देत आहे.
भारतीय हवामान खात्याने यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून तर गुड न्यूज मिळालीच आहे शिवाय आता कांदा बाजारातून देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
कांद्याचे बाजार भाव आता गेल्या काही महिन्यांच्या विक्रमी भाव पातळीवर पोहोचले आहेत. राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याला कमाल तीन हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिकचा दर मिळत आहे.
काही बाजारांमध्ये तर कमाल बाजार भावाने 3500 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. अशा परिस्थितीत, आता आपण आज राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या बाजारात आज लाल कांद्याला किमान 500, कमाल 3500 आणि सरासरी 2400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. याशिवाय कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान 2500, कमाल 3500 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
सातारा एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 1000, कमाल 3200 आणि सरासरी 2100 असा भाव मिळाला आहे. खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान 1000, कमाल 3000 आणि सरासरी 2000 असा भाव मिळाला आहे. पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल 2,600 आणि सरासरी 2400 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.