लोणंद : केंद्रातील मोदी सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या सदर निर्णयानुसार 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू राहणार होती. मात्र ही तारीख जवळ आल्यानंतर केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदीला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन निर्णयानुसार आता जोपर्यंत सरकारकडून या संदर्भातील नवीन आदेश निर्गमित होत नाहीत तोपर्यंत कांदा निर्यात बंदी सुरूच राहणार आहे. या निर्णयाचा मात्र कांदा उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
जेव्हापासून सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे तेव्हापासून कांद्याचे बाजार भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांना 31 मार्चनंतर तरी निर्यात सुरू होईल अशी आशा होती मात्र सरकारने निर्यात बंदीला मुदतवाढ दिली आहे.
यामुळे आगामी काळात देखील बाजार भाव दबावातच राहणार असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कांदा निर्यातदार आणि व्यापारी वर्गाने देखील असेच मत व्यक्त केले आहे.
परिणामी शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी यावेळी केली आहे. तथापि कांदा निर्यात बंदी नवीन सरकार स्थापित झाल्यानंतरच उठवली जाईल असा अंदाज आहे.
मात्र नवीन सरकार जून महिन्यात स्थापित होईल आणि तोवर उन्हाळी हंगामातील शेतकऱ्यांचा सारा कांदा विकला जाणार आहे. यामुळे तेव्हा निर्यात बंदी उठवूनही शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.
यामुळे कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय निवडणुकीच्या काळातच घ्यावा लागणार आहे. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकणार आहे.
दरम्यान आज आपण कांदा निर्यात बंदीला मुदतवाढ दिल्यानंतर लोणंद मध्ये कांद्याला काय भाव मिळतो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
परिणामी शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी यावेळी केली आहे. तथापि कांदा निर्यात बंदी नवीन सरकार स्थापित झाल्यानंतरच उठवली जाईल असा अंदाज आहे.
मात्र नवीन सरकार जून महिन्यात स्थापित होईल आणि तोवर उन्हाळी हंगामातील शेतकऱ्यांचा सारा कांदा विकला जाणार आहे. यामुळे तेव्हा निर्यात बंदी उठवूनही शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.
यामुळे कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय निवडणुकीच्या काळातच घ्यावा लागणार आहे. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकणार आहे.
दरम्यान आज आपण कांदा निर्यात बंदीला मुदतवाढ दिल्यानंतर लोणंद मध्ये कांद्याला काय भाव मिळतो याविषयी माहिती जाणून घेणार आहे
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या टाकळीभान उपबाजार आवारात रविवारी खुल्या कांद्याची आवक झाली. लोणदच्या या लिलावात या उपबाजारात प्रथम श्रेणीच्या कांद्याला 1410 रुपये प्रति क्विंटल ते 1500 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
तसेच द्वितीय श्रेणीचा कांदा ८५० रुपये प्रति क्विंटल ते 1100 रुपये प्रति क्विंटल या भावात विकला गेला आहे. तसेच तृतीय श्रेणीचा कांदा 500 ते 800 रुपये प्रति क्विंटल या दरात विकला गेला आहे. गोल्टी कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल ते 1200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.